'या' आहेत देशातील 10 सर्वात श्रीमंत कंपन्या; अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त भांडवल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:39 IST
1 / 6 Hurun India 500 List: हुरुन इंडिया 500 ची यादी जाहीर होताच देशातील श्रीमंतांच्या संपत्तीची चर्चा सुरू होते. हुरुनने देशातील सर्वात मौल्यवान/श्रीमंत कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानावर आहे. यानंतर टाटा ग्रुपची टीसीएस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ HDFC, भारती एअरटेल आणि ICICI चा नंबर लागतो. 2 / 6भारतातील 500 प्रमुख कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल भारताच्या GDP पेक्षा जास्त आहे. यावरुन भारतातील खाजगी कंपन्यांच्या साम्राज्याचा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे, पहिल्या 10 कंपन्यांचे एकूण भांडवल सौदी अरेबियासह अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे.3 / 6भारतातील अव्वल 500 खाजगी कंपन्यांचे एकूण मूल्य 3.8 ट्रिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 324 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हे देशाच्या 3.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने सलग चौथ्या वर्षी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारती एअरटेल आणि NSE यांना प्रथमच पहिल्या 10 कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. 4 / 6हुरुन इंडिया 500 यादीत देशातील 500 सर्वात मौल्यवान खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी कंपन्या आणि परदेशी किंवा भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्या या यादीतून बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार, या 500 कंपन्या देशाचा आर्थिक कणा असून, सुमारे 84 लाख लोकांना रोजगार देतात.5 / 6मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ही हुरुन इंडिया अहवालात सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती, ज्याचे मूल्य 297 टक्क्यांनी वाढले आहे. लॉजिस्टिक स्टार्टअप Zepto ने 269 टक्के, NSE ने 201 टक्के आणि Physics Wala ने 172 टक्के वाढ नोंदवली आहे. या सर्वांचा सर्वाधिक मूल्यवृद्धी नोंदविणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.6 / 682 नवीन कंपन्यांनी यंदाच्या यादीत स्थान मिळवले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 ने अधिक आहे. भारतीय स्टार्टअप्सचा प्रभाव झपाट्याने वाढत असून गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे हुरुन इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.