शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस जगात सर्वाधिक श्रीमंत, जाणून घ्या मुकेश अंबानींचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:35 PM

1 / 10
हुरूनची ग्लोबल रिच लिस्ट जारी करण्यात आली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2019नुसार, अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस लागोपाठ दुसऱ्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती 147 अब्ज डॉलर म्हणजेच 10 लाख कोटी आहे.
2 / 10
मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांची एकूण 96 अब्ज डॉलर म्हणजेच 6.87 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.
3 / 10
जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेले वॉरन बफे आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 6.30 लाख कोटींच्या आसपास आहे.
4 / 10
बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 86 अब्ज डॉलर असून, जवळपास ती 6.16 लाख कोटींच्या घरात आहे.
5 / 10
फेसबुकचे CEO आणि को फाऊंडर मार्क झकरबर्ग या यादीत पाचव्या स्थानी आहेत. झकरबर्ग यांच्या एकूण 80 अब्ज डॉलर म्हणजेच 5.72 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.
6 / 10
कार्लोस सिम यांची एकूण संपत्ती 66 अब्ज डॉलर असून, ती जवळपास 4.72 लाख कोटींच्या घरात आहे.
7 / 10
अमांसियो ऑर्तेगा यांची एकूण संपत्ती 56 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 4.72 लाख कोटी आहे.
8 / 10
गुगल अल्फाबेटच्या सर्गे ब्रिन यांची एकूण संपत्ती 54 अब्ज डॉलर असून, ती जवळपास 4 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.
9 / 10
रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील सर्वात 10 अब्जोपतींच्या यादीत सहभागी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $54 अब्ज (जवळपास 3.84 लाख कोटी रुपये) आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये आलेल्या उत्साहामुळे मुकेश अंबानी या यादीत नवव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी स्वतःची 65 टक्के संपत्ती गमावून बसले आहेत.
10 / 10
गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांची एकूण संपत्ती 53 अब्ज डॉलर असून, त्यांची एकूण संपत्ती 3.72 लाख कोटी रुपये आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग