शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:06 IST

1 / 5
मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. मात्र, यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडणार आहे. १४२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
2 / 5
२०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षाच्या प्राप्तिकर रिटर्नच्या आकडेवारीनुसार, ७.५४ कोटी पगारदार व्यक्तींनी कर रिटर्न भरले होते. यापैकी ५.८९ कोटी लोकांचे वार्षिक पगार ७ लाख रुपयांपेक्षा कमी होते.
3 / 5
सरकारच्या आकडेवारीनुसार, १२ लाख रुपयांच्या नवीन आयकर नियमानंतर कर सूट मिळणाऱ्या लोकांची संख्या ६.७७ कोटी होईल. याचा अर्थ ८९.८% पगारदार लोक कोणताही आयकर भरणार नाहीत.
4 / 5
इतकेच नाही तर १२.७५ लाख रुपयांची मर्यादा पाहिली तर ही संख्या ६.९२ कोटी होईल. म्हणजे ९१.७% पगारदार लोकांना करातून सूट मिळेल.
5 / 5
सुमारे १.५ कोटी लोकांना, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ते १२ लाख रुपये आहे, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता त्यांना पगाराच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Tax Slabआयकर मर्यादाBudget 2025अर्थसंकल्प २०२५