तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:19 IST
1 / 8गुंतवणूक बँकर आणि बिझनेस एज्युकेटर सार्थक आहुजा यांनी एका व्हिडिओमध्ये घर खरेदी करण्यासाठी चार महत्त्वपूर्ण आर्थिक नियम सांगितले आहेत, जे तुमच्या पगाराच्या हिशोबाने योग्य घर निवडायला मदत करतील.2 / 8सार्थक आहुजा यांच्या मते, घर खरेदी करताना पहिला आणि महत्त्वाचा नियम हा आहे की, घराची किंमत तुमच्या वार्षिक घरगुती उत्पन्नाच्या ५ पटीपेक्षा जास्त नसावी.3 / 8उदाहरणार्थ जर तुमचा मासिक पगार ६०,००० असेल, तर तुमचे वार्षिक उत्पन्न ७.२ लाख रुपये होईल. यानुसार, तुम्ही जास्तीत जास्त ३६ लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करू शकता.4 / 8२०-३०% रक्कम 'डाउन पेमेंट' म्हणून ठेवा. घराची संपूर्ण किंमत कर्जाने चुकवू नये, असा सल्ला आहुजा देतात. तुमच्याकडे घराच्या एकूण किमतीच्या किमान २०% ते ३०% रक्कम 'डाउन पेमेंट' (सुरुवातीला भरण्यासाठी) म्हणून तयार असावी.5 / 8जर घर ३६ लाखांचे असेल, तर तुमच्याकडे ७ लाख रुपये ते १० लाख रुपये डाउन पेमेंटसाठी असावेत. यामुळे कर्जावरील अवलंबित्व कमी होते आणि व्याजाचा बोजा कमी होतो.6 / 8हा तिसरा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. तुमच्या घराच्या कर्जाचा मासिक हप्ता हा तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्य ३५% पेक्षा जास्त नसावा.7 / 8६०,००० रुपये पगार असलेल्या व्यक्तीसाठी EMI २१,००० रुपये प्रति महिन्यापेक्षा जास्त नसावा. यामुळे तुमचे इतर खर्च (रेशन, बिल, मुलांचे शिक्षण, विमा आणि बचत) व्यवस्थित सांभाळले जातील आणि आर्थिक ताण येणार नाही.8 / 8सार्थक आहुजा सांगतात की, कर्जाचा कालावधी जितका जास्त असतो, तितका व्याजाचा बोजाही वाढतो. म्हणून, शक्य असल्यास कर्जाची परतफेड २० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही व्याजापोटी लागणारे लाखो रुपये वाचवू शकता आणि लवकर कर्जमुक्त होऊ शकता.