गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:10 IST
1 / 7जगातील सर्वात अनोखी आणि वजनदार ड्रेस म्हणून 'दुबई ड्रेस'ने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या खास पोशाखाने शारजाह येथील ज्वेलरी एक्स्पोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.2 / 7सौदी अरेबियातील अल रोमाइजान गोल्ड ॲन्ड ज्वेलरी कंपनीने हा खास ड्रेस तयार केला आहे. हा ड्रेस पूर्णपणे २१ कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आला आहे.3 / 7या दुबई ड्रेसचे एकूण वजन तब्बल १०.०८१२ किलोग्राम (१० किलोपेक्षा जास्त) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या सोन्याच्या पोशाखाची किंमत सुमारे ११ कोटी रुपये (४.६ दशलक्ष एईडी) इतकी आहे.4 / 7या दागिन्यांची रचना अमिराती सांस्कृतिक वारसा आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन केली आहे. यात रंगीबेरंगी मौल्यवान दगड आणि अत्यंत आकर्षक आणि बारीक नक्षीकाम केलेले आहे.5 / 7हा ड्रेस एकाच वेळी ४ प्रमुख दागिन्यांनी तयार केला आहे. ३९८ ग्रॅमचा सोन्याचा मुकुट, ८.८ किलोचा हार, ईअररिंग्स आणि 'हेअर' पीस यांचा यात समावेश आहे.6 / 7सध्या ही मौल्यवान कलाकृती शारजाहमध्ये सुरू असलेल्या वॉच ॲन्ड ज्वेलरी एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.7 / 7या ड्रेसचे प्रदर्शन हे यूएईची सोन्याच्या बाजारपेठेत जागतिक नेतृत्व मिळवण्याची महत्त्वाकांक्षा दिसते. अबूधाबीच्या कारागिरांची अनोखी सर्जनशीलता यातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.