शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST
1 / 7भारतीय टायर निर्माता कंपनी एमआरएफ (MRF) च्या शेअर्समध्ये आज (सोमवारी) जोरदार तेजी बघायला मिळाली. हा शेअर आज 4115 रुपयांनी (2.7%) वाढून थेट 154,055 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला आहे. 2 / 7ही तेजी, सरकारने टायरांवरील जीएसटी दरांमध्ये केल्याल्या कपातीमुळे आल्याचे बोलले जात आहे. जी आज 22 सप्टेंबरपासून लागू झाली आहे.3 / 7GST कपातीमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण - सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे आता ग्राहकांना टायर कमी किंमतीत मिलू शकेल. याचा थेट फायदा ग्राहकांना अथवा वाहनधारकांना होईल. यामुळे वाहनाचा देखभाल खर्चही कमी होईल. 4 / 7महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या या निर्णयामुळे बाजारात स्पर्धा वाढेल आणि इतर टायर उत्पादक देखील किंमती कमी करण्यास अथवा ऑफर्स देण्यास प्रवृत्त होतील. अशा प्रकारे GST कपात ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.5 / 7जून तिमाहीत कमी झाला नफा - MRF कंपनीच्या नफ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, जून तिमाहीतील कंपनीचा शुद्ध नफा सुमारे 14% ने कमी होऊन ₹484 कोटींवर आला आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत कंपनीचा नफा ₹563 कोटी एवढा होता. 6 / 7नफ्यावर घट होण्यामागे मुख्य कारण रबरच्या किमतीतील वाढ आहे. कंपनीच्या संचालनातून मिळणारे उत्पन्न 6.8% ने वाढून ₹756 कोटी झाले, तर एकूण खर्च 9.8% ने वाढला आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)