शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! मोदी सरकार मध्यमवर्गासाठी लवकरच देणार मोठी भेट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 4:42 PM

1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कर भरणाऱ्या मध्यमवर्गाला मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
2 / 8
एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, करदाता राष्ट्र निर्माण करणारे आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी 'चार्टर ऑफ राइट्स' आणणार आहे.
3 / 8
जगातील काही देशांमध्ये करदात्यांसाठी चार्टर ऑफ राइट्स लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि अमेरिका देशांचा समावेश आहे, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
4 / 8
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'या चार्टर ऑफ राइट्समध्ये करदात्यांची जबाबदारी आणि अधिकारांचा उल्लेख केला जाईल. आम्ही करदात्यांचे हित लक्षात घेऊन हे प्रयत्न करीत आहोत.'
5 / 8
दरम्यान, अर्थसंकल्पात करदात्यांसाठी चार्टर ऑफ राइट्सची घोषणा करण्यात आली होती. यासाठी संवैधानिक दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे आयकर विभागामार्फत नागरिकांना वेळोवेळी सेवा पुरविली जाईल.
6 / 8
करदात्यांनाही यामध्ये काही नवीन अधिकार मिळू शकतात. मात्र, निर्मला सीतारमण यांनी या चार्टर ऑफ राईट्सबद्दल विस्तृत माहिती दिली नाही.
7 / 8
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'आम्ही करदात्यांना कर प्रक्रिया सुलभ आणि सोपी करीत आहोत.'
8 / 8
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने अनके उपाययोजना आखल्या आहेत.
टॅग्स :Taxकरbusinessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी