शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:54 IST

1 / 8
गेल्या वर्षभरात सोन्याने देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला असून, सेन्सेक्सलाही मागे टाकले आहे.
2 / 8
जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मागील वर्षात सोन्याने ५०.१ टक्के परतावा दिला आहे. याउलट शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.२% घसरला आहे.
3 / 8
व्यापारविषयक अनिश्चितता व टॅरिफ वॉरने सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचे आकर्षण वाढले आहे. ‘एनाम होल्डिंग्ज’चे गुंतवणूक संचालक श्रीधर शिवराम म्हणाले की, “सोन्याची सुमारे २५ टक्के खरेदी ही केंद्रीय बँकांची आहे. शुल्कयुद्ध आणि अमेरिकी ट्रेझरीच्या धोरणापासून बचाव म्हणून गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी ते सोने खरेदी करत आहेत.”
4 / 8
सेन्सेक्स विरुद्ध सोने परतावा कालावधीसोन्याचा सेन्सेक्सचा परतावा (%)परतावा (%) मागील १ वर्ष ५०.१ -१.२ ३ वर्षे (वार्षिक) २९.७ १०.७ ५ वर्षे (वार्षिक) १६.५ १६.१ १० वर्षे (वार्षिक) १५.४ १२.२ २० वर्षे (वार्षिक) १५.२ १२.२
5 / 8
सेन्सेक्स-सोने रेशो : एडेलवाइस म्युच्युअल फंडच्या संशोधनानुसार सध्याचा सेन्सेक्स-गोल्ड रेशो ०.७६ आहे, जो दीर्घकालीन सरासरी ०.९६ पेक्षा कमी आहे.
6 / 8
पुढील अंदाज काय? : यंदा सोन्याच्या किमतीत सुमारे ३८% वाढ झाल्याने पुढील काळात दरवाढ मर्यादित राहू शकते. १०-१५% सोन्यात गुंतवणूक करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. “यंदा सोन्यावर इतर वर्षाइतक्या जास्त परताव्याची अपेक्षित ठेवू नका.
7 / 8
किमती का वाढत आहेत?- व्हेंचुरा सिक्युरिटीजचे कमॉडिटी प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी सांगितले की, “चलनवाढीपासून बचावाबरोबरच या महिन्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करणार असल्याची अपेक्षा असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.” अलीकडेच कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति ट्रॉय औंस ३,७१५.२ डॉलरवर पोहोचली आहे.
8 / 8
सोने कसे जिंकले आहे?- मागील तीन वर्षांत सोन्याचा वार्षिक परतावा २९.७ टक्के, तर सेन्सेक्सचा १०.७ टक्के आहे. पाच वर्षांत सोने १६.५ टक्के, तर सेन्सेक्स १६.१ टक्के वाढले आहे. दहा वर्षांत सोन्याचा परतावा १५.४ टक्के, सेन्सेक्स १२.२ टक्के आहे. तर वीस वर्षांत सोने १५.२ टक्के, तर सेन्सेक्स १२.२ टक्केने वाढले आहे.
टॅग्स :Goldसोनंshare marketशेअर बाजार