शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol Diesel Price: खुशखबर! निवडणूक निकालांनंतर, महाग नाही, स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल; आणखी कमी होणार दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 2:53 PM

1 / 8
पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल महाग नाही, तर स्वस्त झाले आहे. हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल, परंतु हे खरे आहे.
2 / 8
देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर अगदी एक रुपया प्रतिलीटरने कमी झाले आहेत. खरे तर, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.
3 / 8
12 ते 16 रुपयांनी वाढण्याची होती शक्यता - कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाच, पेट्रोलचे दर 12 ते 16 रुपये प्रत‍िलीटरपर्यंत वाढती, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. मात्र, आता दर कमी झाल्याने ग्राहक खुश दिसत आहेत.
4 / 8
आगामी कळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दोनच दिवसांत कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवरून घसरून 108.7 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.
5 / 8
कोणत्या शहरात किती कमी झाला दर - शुक्रवारी भुवनेश्‍वरमध्ये पेट्रोलचा दर कमी होऊन 102.27 रुपयांवरून 101.81 रुपये प्रत‍ि लीटरवर आला आहे. जयपूरमध्ये 108.07 रुपयांवरून 107.06 रुपये प्रत‍ि लीटरवर आला आहे.
6 / 8
डिझएलच्या दरात 91 पैशांची घसरण होऊन तो 90.70 रुपयांवर आला आहे. पाटणा येथील दरही 106.44 रुपयांवरून घसरून शुक्रवारी सकाळी 105.90 रुपयांवर आल्याचे दिसून आले.
7 / 8
या ठिकाणी दर वाढले - गुडगांवमध्ये पेट्रोलचा दर काही प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. येथे पेट्रोल 95.59 रुपयांवर पोहोचले आहे. तर नोएडामध्ये हा दर वाढून 95.73 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे.
8 / 8
मेट्रो शहरांमध्ये काहीही बदल नाही - मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीत कसलाही बदल दिसून आला नाही. नवी द‍िल्‍ली, कोलकाता, मुंबई, चेन्‍नई आणि बेंगळुरूमध्ये हा दर अनुक्रमे, 95.41, 104.67, 109.98, 91.43, आणि 101.40 रुपये प्रत‍ि लीटरवर जैसेथे आहेत.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलElectionनिवडणूक