Gold-Silver Rates : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 16:24 IST
1 / 9आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्चला सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कालपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. 2 / 9मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. येथे १० ग्रॅम सोन्याचा भाव ६० हजारांच्या जवळ पोहोचला आहे.3 / 9जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे आज डॉलरच्या दरात घसरण झाली आहे, त्यामुळे एमसीएक्समध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर देशातील अनेक शहरांमध्ये सोने स्वस्त आणि महाग झाले आहे.4 / 9मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५९८४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने सुरू झाला. डॉलरच्या किमतीत वाढ आणि इतर कारणांमुळे आज सोन्याचा उच्चांक ५९९५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.5 / 9पण एमसीएक्सवर सोने ५९९४० रुपये प्रति १० ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करत होते, यामध्ये ०८ टक्के किंवा ४५ रुपये प्रति १० ग्रॅम वाढ झाली आहे.6 / 9MCX वर, १ किलो चांदीची किंमत ३३ टक्क्यांनी किंवा २३८ रुपयांनी वाढून ७२०१२ रुपयांवर पोहोचली. चांदीची किंमत ७१९५० रुपये प्रति १० ग्रॅमने सुरू झाली आणि ७२१४३ रुपये प्रति १ किलोने उच्चांक गाठला. सोन्या-चांदीची ही किंमत जून आणि मे फ्युचर्ससाठी आहे.7 / 9अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढून ६०,०५० रुपयांवर पोहोचला आहे. बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढून ६०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.8 / 9चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढला असून येथे ६०,१५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने २७० रुपयांनी महागले असून येथे सोन्याची किंमत ६०,९८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढून ६०१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.9 / 9लखनौमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ३३० रुपयांनी महागून ६०,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. पाटणामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ३३० रुपयांनी वाढून ६०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.