Gold Silver Rate: सोनं-चांदी महागले की घसरले, फटाफट चेक करा आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:42 IST
1 / 10Gold Silver Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळत असून त्यामुळे सोने-चांदी तेजीसह व्यवहार करत आहेत. 2 / 10Gold Silver Rate: देशातील विविध शहरांमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. जागतिक मागणीत झालेली वाढ आणि चलन बाजारात डॉलरची घसरण याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत असून या परिणामामुळे सोने आणि चांदी तेजीच्या मार्गावर आहेत.3 / 10मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज सोन्याचा भाव तेजीसह व्यवहार करत आहे. त्याच्या किंमतीत 145 रुपये किंवा 0.25 टक्क्यांची ताकद दिसून येत आहे.4 / 10सोन्याचे दर आज 59280 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने आहे. या खालच्या दरांवर नजर टाकली तर ते 59215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले. 5 / 10वरील दर पाहता तो 59313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला. या सोन्याच्या किमती त्याच्या ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहेत.6 / 10मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीचा भाव 250 रुपयांच्या वर आहे. आज चांदी 257 रुपये किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 75824 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.7 / 10चांदीचा भाव खालच्या बाजूला 75714 रुपये प्रति किलो आणि वरच्या बाजूला 75899 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांदीची ही पातळी त्याच्या ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहे.8 / 10दिल्लीत 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कायम आहे.9 / 10मुंबईत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 120 रुपयांनी वाढून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून 60,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.10 / 10कोलकातामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 120 रुपयांनी वाढून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.