खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही झाले बदल; तुमच्या शहरातील दर तपासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:25 IST
1 / 7तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात १२०० रुपयांची घसरण दिसून आली आहे. 2 / 7ही घसरण गेल्या आठवडाभरात दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, 'फेड' कडून दर कपातीबाबत शंका असल्याने सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे.3 / 7दुसरीकडे, डॉलर निर्देशांकाची पातळीही १०३ च्या वर गेली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. 4 / 7आज देशातील वायदे बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी ११:१५ वाजता सोन्याचा भाव २७४ रुपयांच्या घसरणीसह ६५,२६८ रुपयांवर व्यवहार करत आहे. 5 / 7तर आज सकाळी ९ वाजता सोन्याचा भाव ६५,३४८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान सोन्याचा भावही ६५,१८० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर सोन्याचा भाव ६५,५४२ रुपये प्रति दहा ग्रॅम होता.6 / 7मागील आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम सुमारे १२०० रुपयांची घसरण झाली आहे. ८ मार्च रोजी सोन्याचा भाव ६६,३५६ रुपये प्रति दहा ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून सातत्याने घसरण होत आहे.7 / 7मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा भाव ६५,१८० रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या ७ व्यापार दिवसांत सोन्याचा भाव १,१७६ रुपये प्रति दहा ग्रॅमने घसरला आहे.