By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:17 IST
1 / 8सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांत १,७०० रुपयांची आणि चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. 2 / 8एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यासाठीच्या सोन्याच्या वायदा दरात ०.३७ टक्क्यांची वाढीसह ट्रेंड सुरू आहे. तर सप्टेंबरसाठी चांदीच्या वायदा दरात ०.८४ टक्के प्रतिकिलो वाढ झालेली दिसत आहे. 3 / 8शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे १ हजार आणि चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल २ हजार रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. तर सोमवारी सोन्याचा दर ७०० रुपयांनी आणि चांदीचा दर २,२५० रुपयांनी गडगडला होता. 4 / 8आज एमसीएक्सवर सोन्याच्या ऑक्टोबरसाठीच्या वायदा दरात १७० रुपयांची वाढ दिसून येत आहे. प्रति १० ग्रॅमसाठी ४६,०५६ रुपये इतका सोन्याचा दर सुरू आहे. तर आंतरराष्ट्रीज बाजारात सोन्याचा दर १,७३०.४७ डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे. 5 / 8एमसीएक्सवर सप्टेंबरसाठीच्या चांदीच्या वायदा दरात ५२५ रुपयांनी वाढ होऊन प्रतिकिलो ६३,१६२ रुपायांवर ट्रेंड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर २३.४३ डॉलर प्रतिऔंस इतका नोंदविण्यात आला आहे. 6 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांमध्ये निच्चांकी स्तरावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. 7 / 8अमेरिकी बॉन्ड यील्ड्समध्ये झालेली वाढ आणि गेल्या आठवड्यात अमेरिकेतील रोजगाराच्या वाढत्या आकड्यामुळे डॉलरला मजबुती मिळाली. 8 / 8जगातील सर्वात मोठ्या गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची (SPDR Gold Trust) होल्डिंग सोमवारी ०.२ टक्क्यांनी घसरून १,०२३.५४ टन इतकी झाली आहे. शुक्रवारी हाच आकडा १,०२५.२८ टन इतका होता.