शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver latest price: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 6:31 PM

1 / 9
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीचा परिणाम स्थानिक बाजारतही पाहायला मिळाला. सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरणीची नोंदवण्यात आली आहे.
2 / 9
सोन्याच्या दरात आज प्रति १० ग्रॅममागे १२३ रुपयांची आणि चांदीच्या दरात २०६ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४६,५०५ रुपये इतका नोंदविण्यात आला. तर चांदीचा दर प्रतिकिलो ६५ हजार ७१० रुपये इतका नोंदविण्यात आला.
3 / 9
HDFC Securities चे वरिष्ठ सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकी फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीआधी सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला होता. पुन्हा एकदा सोनं 1800 डॉलरच्या खाली पोहोचलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ०.१४ टक्के घसरणीसह १,७९६.६५ डॉलरच्या स्तरावर पोहोचलं.
4 / 9
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार आज २४ कॅरेट सोन्याचा क्लोजिंग दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ७२४ रुपये इतका नोंदविण्यात आला. तर चांदीचा दर ६६ हजार ९८८ रुपये प्रतिकिलो इतका नोंदविण्यात आला. सोन्याच्या दरात २२५ रुपये, तर चांदीच्या दरात ५६७ रुपये घट नोंदविण्यात आली.
5 / 9
एमसीएक्सवर दुपारी ५ वाजून १० मिनिटांनी ऑगस्टसाठीचा सोन्याचा डिलिव्हरी दरात ३७ रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यासह सोन्याचा दर एमसीएक्सवर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ४९८ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर ऑक्टोबरसाठीच्या सोन्याच्या डिलिव्हरीत १४ रुपयांची तेजी पाहायला मिळाली.
6 / 9
एमसीएक्सवर डिसेंबरसाठीचा सोन्याचा डिलिव्हरी दर १५२ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ९८१ रुपयांवर ट्रेंड करत होता.
7 / 9
चांदीच्या दरात एमसीएक्सवर घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सप्टेंबरसाठीच्या दरात १२१ रुपयांच्या घसरणीसह प्रति किलो ६७ हजार रुपयांवर ट्रेंड करत होतं. तर डिसेंबरसाठीचा डिलिव्हरी दर २२३ रुपयांच्या घसरणीसह ६७ हजार ९८० रुपयांवर ट्रेंड करत होता.
8 / 9
दरम्यान, सोनं खरेदीसाठी हिच उत्तम संधी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. कारण दिवाळीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
9 / 9
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेचं वातावरण आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दिवळीपर्यंत सोन्याचा दर पुन्हा एकदा ५० हजारांची पातळी ओलांडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी