Gold Rates Today : सेन्सेक्स-निफ्टीनंतर सोन्यानंही रचला इतिहास, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे लेटेस्ट दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:12 IST
1 / 6Gold Silver Price 26 Sep: शेअर बाजारापाठोपाठ आता सराफा बाजारही इतिहास रचत आहे. सेन्सेक्स-निफ्टीपाठोपाठ सोन्यानेही उच्चांक गाठला आहे. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५४०६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलाय. 2 / 6. चांदीही ९०८१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर खुली झाली. अवघ्या ७ दिवसात सोनं २३५२ रुपयांनी महागलं आहे. मात्र, या काळात चांदीच्या दरात ३५६२ रुपयांची वाढ झाली आहे.3 / 6सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.4 / 6आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १५७ रुपयांनी वाढून ७५१०४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६९,९९६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ११९ रुपयांनी वाढला असून तो ५६,५५५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ९३ रुपयांनी वाढून ४४११३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.5 / 6जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७७६६८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २२६२ रुपये जीएसटीचा समावेश आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७७३५७ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२५३ रुपयांची भर पडली. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७११४४ रुपयांवर पोहोचलं. यात जीएसटी म्हणून २०७२ रुपयांची भर पडली आहे.6 / 6१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १६९६ रुपये जीएसटीसह ५८२५१ रुपये झाला आहे. यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सच्या नफ्याचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९३५४१ रुपयांवर पोहोचला.