शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate Today: सोन्याची किंमत ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; चांदीचा भावही झाला कमी, पाहा आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 11:52 IST

1 / 5
कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज सोने आणि चांदीचे भाव कमी झालेत. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर या महिन्यात MCX वर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.13 टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 1 टक्क्यानं घसरल्या. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचे भाव 0.16 टक्क्यांनी घसरले होते, तर चांदीचे भाव 1.76 टक्क्यांनी कमी झाले होते.
2 / 5
जागतिक बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी कमी झाली. या आठवड्याच्या शेवटी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध आहेत. स्पॉट सोने 0.1% घसरून 1,752.66 डॉलर प्रति औंस झाले.
3 / 5
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत 58 रुपये किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 45,928 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.1 टक्क्यांनी घसरून 1752.66 डॉलर प्रति औंस झाले. दुसरीकडे एमसीएक्सवरील डिसेंबर वायदा चांदी 565 किंवा 1 टक्क्यांनी घसरून 59,427 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 22.33 डॉलर प्रति औंस झाली.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय