By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:18 IST
1 / 9Gold Rate Today : वर्षाच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. भारतीय सराफा बाजारात आज 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सोने महाग झाले असून चांदी स्वस्त झाली आहे. 2 / 9Gold Rate Today : सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे असताना, चांदीचा भाव 74 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 63031 रुपये आहे. 3 / 9Gold Rate Today : तर 999 शुद्ध चांदीची किंमत 74693 रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोने 62844 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज सकाळी महाग झाले आहे आणि 63031 रुपयांवर पोहोचले आहे. 4 / 9शुद्धतेच्या आधारे सोने महाग झाले असले तरी चांदी स्वस्त झाली आहे. शनिवार आणि रविवारी सराफा बाजाराचे दर जाहीर होत नाहीत, तर नाताळच्या सुट्टीमुळे सोमवारी बाजार बंद होता. 5 / 9ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज 995 शुद्ध सोन्याची किंमत 62779 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 57736 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 47273 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 36873 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.6 / 9मुंबई - मुंबईत सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,400 रुपये प्रतितोळा आणि 63,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 7 / 9दिल्ली - दिल्लीत 24 कॅरेट सोनं 63860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 8 / 9कोलकाता - कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63,710 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58550 प्रतितोळा आहे. चेन्नई - चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)9 / 9मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. तुम्ही अधिकृत वेबसाइट ibjarates.com वर जाऊन सकाळ आणि संध्याकाळचे सोन्याचे दर अपडेट जाणून घेऊ शकता.