शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 09:13 IST

1 / 6
Gold Rate Forecast: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत मोठे चढ-उतार दिसून येत आहे. असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याची किंमत ५०,००० रुपयांच्या आत होती. आज सोन्याची किंमत १ लाख रुपयांवर पोहोचली आहे. आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०२,६४० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमतही जवळपास आहे.
2 / 6
देशातील सर्वच शहरांमध्ये हाच दर कमी-अधिक प्रमाणात आहे. सोन्याची किंमत ३०००० रुपयांच्या आसपास असायची. पण जुलै २०२५ पर्यंत याची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या ६ वर्षांतील याच्या किमतींची तुलना केली तर २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुढे किती पुढे जाऊ शकतात जाणून घेऊ?
3 / 6
सोन्याचे भाव का वाढताहेत? : सोन्याच्या वाढत्या किमती पाहून तुमच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की सोन्याचे भाव का वाढत आहेत? खरं तर, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सोन्याच्या किमती वाढण्यामागे जागतिक तणाव हे एक प्रमुख कारण आहे.
4 / 6
एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. याशिवाय कोविड-१९ साथीच्यामुळे आणि आर्थिक अनिश्चिततेमुळेही सोन्याच्या किमती वाढत आहेत.
5 / 6
गुंतवणुकदारांसाठी सोनं हा नेहमीच सुरक्षित मार्ग राहिला आहे. एप्रिल २०२५ मध्ये एमसीएक्समध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव १,०१,०७८ रुपयांवर पोहोचला होता. लाइव्ह मिंटच्या म्हणण्यानुसार, सोन्याची ही तेजी पाहता पुढील ५ वर्षांत १० ग्रॅम सोन्याची किंमत २,२५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. २०१९ ते २०२५ या कालावधीत सोन्याच्या दरात दरवर्षी १८ टक्के दराने वाढ झाली आहे. असंच सुरू राहिलं तर किंमत अडीच लाखांपर्यंत पोहोचेल.
6 / 6
मात्र, आणखी एका अहवालात म्हटलंय की, सोने बाजार कन्सोलिडेशनमध्ये एन्ट्री करत आहे. जोपर्यंत एखादी मोठी घटना किंवा आंतरराष्ट्रीय तणाव दिसत नाही, तोपर्यंत किंमती स्थिर राहू शकतात. चीननं आपल्या विमा क्षेत्रातील एकूण मालमत्तेच्या (एयूएम) एक टक्के रक्कम सोन्यात गुंतवली आहे. मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी कमी करत आहेत.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूकMONEYपैसा