६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:14 IST
1 / 8वर्ल्ड गोल्ड कौन्सिल नुसार, अमेरिकन डॉलरची कमजोरी, कमी व्याजदर आणि जगभरातील वाढलेला आर्थिक आणि राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. या परिस्थितीमुळे सोन्यातील गुंतवणुकीची मागणी खूप वाढली आहे.2 / 8WGC च्या अहवालात असे म्हटले आहे की, जर बाजारातील सध्याचे अंदाज खरे ठरले, तर वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतही सोन्याची किंमत स्थिर राहू शकते किंवा त्यात थोडी वाढ होऊ शकते. या काळात सोन्यात ० ते ५ टक्क्यांची आणखी वाढ दिसून येऊ शकते.3 / 8सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सॉवरेन गोल्ड बाँड (SGB). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१५ पासून ६७ वेळा हे बाँड जारी केले आहेत. हे बाँड शेअर बाजारात विकत घेता येतात आणि किरकोळ गुंतवणूकदार डीमॅट खात्यातून ते खरेदी-विक्री करू शकतात.4 / 8सॉवरेन गोल्ड बाँडची मुदत आठ वर्षांची असते, पण पहिले पाच वर्षे त्यात 'लॉक-इन' असतो. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वर्षाच्या शेवटी RBI कडून परत विकत घेण्याचा पर्याय (बायबॅक) दिला जातो. जर तुम्हाला मुदतीपूर्वी बाँड विकायचे असतील, तर ते तुम्ही ठराविक एजन्सींमार्फत करू शकता.5 / 8दुसरा पर्याय म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. हे फंड गोल्ड ईटीएफमध्ये (Exchange Traded Funds) गुंतवणूक करतात. प्रत्येक फंडाला एक फंड मॅनेजर सांभाळतो, जो बाजारातील स्थितीनुसार गुंतवणुकीचे निर्णय घेतो. यांची किंमत दररोज 'नेट अॅसेट व्हॅल्यू' (NAV) द्वारे ठरते.6 / 8गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे, ते तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड हाऊसद्वारे करू शकता. मात्र, यांचा खर्च (Expense Ratio) थोडा जास्त असतो, साधारणपणे १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान. गोल्ड ईटीएफपेक्षा हा खर्च जास्त असतो.7 / 8भारतात आजही लोक भौतिक सोने (दागिने, नाणी) खरेदी करण्यास जास्त पसंती देतात. हा एक आकर्षक पर्याय असला तरी, त्याच्या सुरक्षिततेची आणि शुद्धतेची काळजी घ्यावी लागते. तरीही गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.8 / 8याशिवाय, गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल सोन्यात ही गुंतवणूक करता येते. गोल्ड ईटीएफ सोन्याच्या किमतीनुसार चालतो आणि शुद्ध सोन्यात गुंतवणूक करतो, तर डिजिटल सोन्यात तुम्ही पेटीएम, फोनपेसारख्या प्लॅटफॉर्मवर थोड्या रकमेपासून गुंतवणूक करू शकता आणि नंतर हवे असल्यास खरे सोने मिळवू शकता.