शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:31 IST

1 / 6
सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीनं उच्चांक गाठलाय. या वर्षी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढही झाली आहे. सोन्याच्या किमतीत सध्याच्या पातळीपासून कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये १५ ते ३० टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असं वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) एका अहवालात म्हटलं आहे.
2 / 6
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, २०२५ या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे ५३ टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेचे शुल्क (American tariff) आणि भूराजकीय तणाव (geopolitical tensions) यांसारख्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी सोन्याला एक सुरक्षित पर्याय म्हणून अधिक पसंती दिली आहे.
3 / 6
याशिवाय, जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही सोन्याची खरेदी केली आणि व्याजदरांबाबतच्या त्यांच्या भूमिकेनंही २०२५ मध्ये सोन्याच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात असंही म्हटलंय की, डायव्हर्सिफिकेशन आणि स्थिरता लक्षात घेऊन २०२५ मध्ये गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांनी दोघांनीही सोन्यामधील आपली गुंतवणूक वाढवली आहे.
4 / 6
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, घसरतं यील्ड, वाढता भूराजकीय तणाव आणि सुरक्षित पर्याय सोन्यासाठी एक मजबूत वातावरण तयार करतील. ज्यामुळे सोन्याच्या किमतीतील वाढीला पाठिंबा मिळेल. अशा परिस्थितीत, २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीत सध्याच्या स्तरावरून १५ ते ३० टक्के पर्यंत वाढ होऊ शकते.
5 / 6
गुंतवणुकीची मागणी, विशेषतः गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) द्वारे होणारी गुंतवणूक, एक प्रमुख घटक असेल, असं वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचं म्हणणं आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत जागतिक गोल्ड ईटीएफमध्ये ७७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, त्यांच्या होल्डिंगमध्ये ७०० टनांहून अधिक सोन्याची भर पडली.
6 / 6
त्याच वेळी, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनं असाही इशारा दिलाय की, जर सोन्याच्या किमतीत घसरण झाली, तर कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये सोन्याचे दर ५ ते २० टक्के पर्यंत तुटू शकतात. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर कोणत्या पातळीवर जातील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInvestmentगुंतवणूक