सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:55 IST
1 / 11सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत सात्तायने वाढ होताना दिसत आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच सोन्याच्या वाढत्या किंमतीने लोकांचे टेन्शन वाढवले आहे. बुधवारी (8 ऑक्टोबर) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसत आहे. बुधवारी भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,22,000 च्याही पार केला आहे.2 / 11भारतीय गुंतवणूकदारांची खरेदी आणि जागतिक पातळीवर सुरू असलेल्या काही समस्यांमुळे सोन्याचा दर आकाशाला भिडला आहे. याशिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीच्या शक्यतेने सोन्याच्या भावात तेजी दिसत आहे. जर आपणही सोने खरेदीचा विचार करत असाल तर, जाणून घ्या आपल्या शहरातील रेट...3 / 11जाणून घ्या, आपल्या शहरातील सोन्याचा लेटेस्ट रेट ( सर्व दर प्रति 10 ग्रॅम) - दिल्ली - 24 कॅरेट - 1,22,080 रुपये, 22 कॅरेट - 1,12,010 रुपये, 18 कॅरेट - 91,680 रुपये.4 / 11मुंबई - 24 कॅरेट - 1,22,030 रुपये, 22 कॅरेट - 1,11,860 रुपये, 18 कॅरेट - 91,530 रुपये. 5 / 11चेन्नई - 24 कॅरेट - 1,22,190 रुपये, 22 कॅरेट - 1,12,010 रुपये 18 कॅरेट - 92,760 रुपये. 6 / 11कोलकाता - 24 कॅरेट - 1,22,030 रुपये, 22 कॅरेट - 1,11,860 रुपये, 18 कॅरेट - 91,530 रुपये. 7 / 11अहमदाबाद - (प्रति 10 ग्रॅम), 24 कॅरेट - 1,22,080 रुपये, 22 कॅरेट - 1,11,910 रुपये, 18 कॅरेट - 91,530 रुपये.8 / 11बँगलोर - (प्रति 10 ग्रॅम), 24 कॅरेट - 1,22,030 रुपये, 22 कॅरेट - 1,11,860 रुपये, 18 कॅरेट - 91,530 रुपये. याशिवाय, लखनौ - 24 कॅरेट - 1,22,080 रुपये, 22 कॅरेट - 1,12,010 रुपये, तर 18 कॅरेट - 91,680 रुपये.9 / 11चांदीच्या दरातही तेजी - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत बुधवारच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 1,57,100 रुपये (प्रति किलोग्रॅम) होता. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ दिसत आहे. 10 / 117 ऑक्टोबरला दिल्लीत चांदीचा दर 1,57,000 रुपये होता. खरे तर, चांदीने ऑक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 11 / 117 ऑक्टोबरला दिल्लीत चांदीचा दर 1,57,000 रुपये होता. खरे तर, चांदीने ऑक्टोबर महिन्यात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.