शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत होतं पुस्तकांचं दुकान, आज ३००० कोटींचे मालक! रोबोमुळे वादात आलेल्या गलगोटियांची संपूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:56 IST

1 / 8
दिल्लीमधील शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखली जाणारी गलगोटिया युनिव्हर्सिटी सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे सोशल मीडियावर गाजत असलेला 'रोबो डॉग' वाद आणि दुसरे म्हणजे एका छोट्या बुक स्टोअरपासून सुरू झालेला युनिव्हर्सिटीचा थक्क करणारा प्रवास.
2 / 8
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या एका एआय समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने एक रोबो डॉग प्रदर्शित केला होता. हा रोबो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, सोशल मीडियावर यावरून नवा वाद उफाळला आहे.
3 / 8
हा रोबो डॉग मेड इन चायना असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला असून, यामुळे समिटमधून युनिव्हर्सिटीचा स्टॉल हटवल्याची चर्चाही रंगली आहे. अद्याप युनिव्हर्सिटीकडून यावर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
4 / 8
दुसरीकडे आज ३००० कोटींचे शैक्षणिक साम्राज्य उभे करणाऱ्या सुनील गलगोटिया यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाला साजेसा आहे. गलगोटिया कुटुंबाचे दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये ईडी गलगोटिया अँड संस नावाचे एक छोटेसे पुस्तकांचे दुकान होते.
5 / 8
सुनील गलगोटिया यांनी व्यवसाय हाती घेतल्यावर १९८० च्या दशकात 'गलगोटिया पब्लिकेशन्स'ची सुरुवात केली. त्यांनी अवघ्या ९,००० रुपयांचे कर्ज घेऊन पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यांना 'Barron’s' च्या SAT आणि TOEFL सारख्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या वितरणाचे हक्क मिळाले आणि व्यवसायाचे स्वरूप बदलले.
6 / 8
पुस्तकांच्या व्यवसायानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले. २००० मध्ये केवळ ४० विद्यार्थ्यांसह पहिल्या संस्थेची पायाभरणी झाली आणि २०११ मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली. आज त्यांचे पुत्र ध्रुव गलगोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्रुप वेगाने विस्तारत आहे.
7 / 8
सध्या या विद्यापीठात ४० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण भारतातील अनेक मोठ्या सरकारी विद्यापीठांच्या तुलनेतही मोठे आहे. केवळ भारतच नाही, तर जगातील ४० पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात.
8 / 8
सध्या या विद्यापीठात ४० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण भारतातील अनेक मोठ्या सरकारी विद्यापीठांच्या तुलनेतही मोठे आहे. केवळ भारतच नाही, तर जगातील ४० पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात.
टॅग्स :Educationशिक्षणArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स