शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पगार ५० हजार असो वा १ लाख; 'हा' एक फॉर्म्युला करेल कोट्यधीश; गुंतवणुकीचे 'सुपर हिट' गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:22 IST

1 / 7
आर्थिक नियोजनासाठी जगभरात ५०-३०-२० हा नियम अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुमचे मासिक उत्पन्न १ लाख रुपये असेल, तर या नियमानुसार त्याचे तीन भाग पडतात.
2 / 7
५०% हिस्सा - जीवनावश्यक गरजा : तुमच्या पगारातील अर्धी रक्कम म्हणजेच ५०,००० रुपये घरभाडे, रेशन, वीज बिल, पाण्याचे बिल आणि मुलांची शाळा फी यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी खर्च करा. हा खर्च टाळता येत नाही, त्यामुळे त्याचे नियोजन सर्वात आधी असावे.
3 / 7
३०% हिस्सा - वैयक्तिक इच्छा : पगारातील ३०,००० रुपये तुम्ही तुमच्या आवडीनिवडीवर खर्च करू शकता. यात फिरणे, शॉपिंग, चित्रपट, हॉटेलिंग किंवा तुमचे छंद जोपासणे यांचा समावेश होतो. यामुळे तुमच्या जीवनशैलीचा दर्जा टिकून राहतो.
4 / 7
२०% हिस्सा - बचत आणि गुंतवणूक : कमीत कमी २०,००० रुपये दरमहा गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. जर तुमचे वैयक्तिक खर्च (३०%) कमी असतील, तर तुम्ही गुंतवणुकीचा हा आकडा वाढवू शकता. पण २० टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करणे भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
5 / 7
एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवण्याऐवजी पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. म्युच्युअल फंड : दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी १० ते १२ हजार रुपयांची एसआयपी सुरू करा. PPF आणि EPF : सुरक्षित परताव्यासाठी आणि टॅक्स बचतीसाठी पीपीएफ किंवा ईपीएफमध्ये गुंतवणूक करा.
6 / 7
विमा : स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी 'टर्म इंश्योरेंस' आणि 'हेल्थ इंश्योरेंस' घेणे ही गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. इमर्जन्सी फंड : अचानक उद्भवणाऱ्या संकटासाठी किमान ६ महिन्यांचा पगार बाजूला काढून ठेवा.
7 / 7
ज्यांचा पगार ५० हजार रुपये आहे, त्यांनीही हाच ५०-३०-२० चा नियम लावावा. १) २५,००० रुपये गरजांसाठी. २) १५,००० रुपये : आवडीनिवडीसाठी. ३) १०,००० रुपये : गुंतवणुकीसाठी.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६InvestmentगुंतवणूकMutual Fundम्युच्युअल फंडMONEYपैसाshare marketशेअर बाजार