शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:08 IST

1 / 6
पुण्यातील खराडी परिसरात एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. एका उच्चभ्रू निवासी भागातील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
2 / 6
या पार्टीतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलं आहे. प्रांजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांच्या दुसऱ्या कन्या, रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती आहेत. खडसेंचे मोठे जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी यापूर्वी ईडीच्या कारवाई निमित्त तुरुंगवास भोगला आहे.
3 / 6
डॉ. प्रांजल खेवलकर यांचे विविध क्षेत्रात व्यवसाय आहेत. ते साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
4 / 6
त्यांची कंपनी संत मुक्तल शुगर अँड एनर्जी लिमिटेड ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय, एपी इव्हेंट्स अँड मीडियाने इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्यांची एक ट्रॅव्हल कंपनी देखील आहे.
5 / 6
दरम्यान, रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
6 / 6
दरम्यान, रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेRohini Khadseरोहिणी खडसेPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी