'या' ३ देशांमध्ये राहतात जगातील ५० टक्के श्रीमंत लोक! भारताचं नाव यादीत आहे की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:19 IST
1 / 8एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असं वर्णन आपण नेहमी ऐकतो. पण, परकीय आक्रमकांनी येथील संपत्ती लुटून नेल्याचंही सांगितलं जातं. मात्र, त्यानंतरही भारताने अफाट प्रगती केली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत भारतीयांची नावे हमखास असतात.2 / 8फोर्ब्सने नुकतीच जागतिक अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील एकूण ३,०२८ लोकांचा समावेश आहे. यंदा २४७ नवीन अब्जाधीशांची यात भर पडली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सह-संस्थापक इलॉन मस्क या यादीत शीर्षस्थानी आहेत. त्यांच्यानंतर मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांचे नाव येते. पण, तुम्हाला माहिती का? जगताली ५० टक्के श्रीमंत लोक फक्त ३ देशांतच आहेत.3 / 8फोर्ब्सच्या यादीनुसार, सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. महासत्ता असलेल्या या देशात ९०२ अब्जाधीश आहेत. त्यानंतर चीन (५१६, ज्यामध्ये हाँगकाँगचाही समावेश आहे) आणि भारत (२०५ अब्जाधीश) यांचा क्रमांक लागतो.4 / 8यादीतील सर्व श्रीमंत लोकांपैकी ५०% पेक्षा जास्त लोक या ३ देशांचे नागरिक आहेत. यामध्ये एकूण ७६ देश दोन अर्ध-स्वायत्त प्रदेशांचा समावेश आहे. अल्बेनियाचा या यादीत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.5 / 8अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीच्या पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. अबांनींकडे ९२.५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर गौतम अदानी, सावित्री जिंदाल कुटुंब, शिव नाडर, दिलीप संघवी आणि सायरस पूनावाला यांची नावे येतात.6 / 8यादीनुसार, पहिल्या क्रमांकावर असेलल्या अमेरिकेत सर्वाधिक ९०२ अब्जाधीश आहेत. त्याखालोखाल चीनध्ये ४५० अब्जाधीश वास्तव्य करतात. भारत विकसनशील राष्ट्र असेल तरी इथे २०५ अब्जाधीश आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीत १७१ अब्जाधीश राहतात.7 / 8युक्रेनसोबत युद्धात अडकलेल्या रशियात १४० अब्जाधीश आहेत. तर सहाव्या नंबरवर असलेल्या कॅनडामध्ये ७६ अब्जाधीश राहतात. छोटा देशी असलेल्या इटलीमध्ये ७४ अब्जाधीश आहेत.8 / 8चीनचा शेजारी राष्ट्र हाँगकाँगमध्ये ६६ अब्जाधीश आहेत. तर ब्राझीलमध्ये ५६ अब्जाधीश राहतात. कधीकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनमध्ये ५५ अब्जाधीश आहेत.