By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:48 IST
1 / 7जुलै २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ५५.२ टक्के वाढली आहे, अशी माहिती 'फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन'ने (फाडा) दिली आहे. 'फाडा'च्या अहवालातील आकडेवारीनुसार, जुलै २०२४ मध्ये १,७९,०३८ ई-वाहनांची विक्री झाली. 2 / 7गेल्यावर्षी १,१६,२११ ई-वाहनांची विक्री झाली होती. ई-बाईकच्या विक्रीत ९५.९४ टक्के वाढ झाली. १,०७,०१६ ई- बाईकची विक्री जुलै २०२४ मध्ये झाली. 3 / 7गेल्यावर्षी याच समान कालावधीत ५४,६१६ ई-बाईक विकल्या गेल्या होत्या.4 / 7ई-तीनचाकी वाहनांच्या विक्रीत १८.१८ टक्के वाढ झाली. ६३,६६७ ई- तीनचाकी या महिन्यात विकल्या गेल्या. 5 / 7दरम्यान, ई-व्यावसायिक वाहनांची विक्री दुपटीने वाढून ८१६ झाल्याचे दिसून आले आहे. ई-प्रवासी वाहनांची विक्री २.९२ टक्के घसरून ७,५४१ वाहनांवर आली.6 / 7जुनी वाहने भंगारात काढण्याची योजना धिमीच: १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याच्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद आहे. सध्या महिन्याला ४ हजार ते ५ हजार वाहने भंगारात येत आहेत. 7 / 7९ लाख जुन्या गाड्या भंगारात काढण्याचे उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे.