फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 20:31 IST
1 / 9आपल्या गुंतवणूकदारांना ८ बोनस शेअर्स देणारी कंपनी डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडच्या शेअरवर सध्या सर्वांचे लक्ष आहे. कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. 2 / 9बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीला ३ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. कंपनीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी या कामाच्या ऑर्डरसंदर्भात माहिती दिली.3 / 9काय आहे काम? - कंपनीने, एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, तिला कमलांग स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट (३ x ८.२० मेगावॅट) मध्ये इंजिनिअरिंग कंसल्टन्सी सर्व्हिसेसचे काम मिळाले आहे. कंपनीला हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. या कामाच्या ऑर्डरचे मूल्य ३,००,००,००० रुपये एवढे आहे.4 / 9कंपनीची एका वर्षातील कामगिरी? - गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १२ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. मात्र, एका वर्षाचा विचार करता, हा शेअर १७ टक्क्यांनी घसरला आहे. 5 / 9शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आले. ५ टक्क्यांच्या घसरणीनंतर, कंपनीच्या शेअर्सची किंमत बीएसईवर ५४.२२ रुपयांच्या पातळीवर होती. 6 / 9महत्वाचे म्हणजे, कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ५६.२३ कोटी रुपये आहे.7 / 9२ वर्षांत १०२ टक्क्यांची तेजी - या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत १०२ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. याच वेळी, डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत ३ वर्षात ५३७ टक्क्यांची वाढ झाली आहे.8 / 9गेल्या डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्समध्ये एक्स-बोनस ट्रेडिंग झाले. तेव्हा कंपनीने ५ शेअर्सवर ८ बोनस शेअर दिले. कंपनीने गेल्या महिन्यातच एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग केले. तेव्हा कंपनीने एका शेअरवर १३ पैशांचा लाभांश दिला.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)