पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:08 IST
1 / 7Post Office Saving Schemes: रिझर्व्ह बँकेनं (RBI) पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयनं यावर्षी चौथींदा रेपो रेट कमी केला असून, यंदा एकूण १.२५ टक्क्यांची कपात झाली. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांनी एफडीचे व्याजदर देखील कमी केले आहेत. मात्र, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच बंपर व्याजदर देत आहे.2 / 7आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेत तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खात्यात (Joint Account) २,००,००० रुपये जमा करून ८९,९९० रुपयांचे निश्चित व्याज मिळवू शकता.3 / 7पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीला टीडी (टाइम डिपॉझिट) या नावाने ओळखलं जातं.4 / 7पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवर सध्याचे व्याजदर पुढीलप्रमाणे आहेत. पोस्टात १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के, ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के (सर्वाधिक) व्याज दिलं जातं.5 / 7पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत तुम्ही सिंगल अकाउंटसोबतच जॉइंट अकाउंटही उघडू शकता. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना सहभागी करता येतं.6 / 7पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टीडी योजनेवर सर्वात जास्त ७.५ टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही ५ वर्षांच्या टीडी योजनेत आपल्या पत्नीसोबत मिळून संयुक्त खात्यात २,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,८९,९९० रुपये मिळतील. यात ८९,९९० रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.7 / 7सध्या देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडी योजनेवर ७.५ टक्के व्याजदर देत नाही. पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्व वयोगटातील नागरिकांना समान व्याज मिळतं, तर बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही निवडक कालावधीच्या एफडी योजनांवर ०.५० टक्के जास्त व्याज मिळतं.