शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 08:40 IST

1 / 7
Post Office Savings Scheme: देशातील विविध बँकांनी मुदत ठेव (FD) योजनांवरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीनंतर बँकांनी हे पाऊल उचललं आहे. रिझर्व्ह बँकेने यावर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली असून, त्यामुळे बँकांच्या एफडी दरांमध्येही मोठी घट झाली आहे.
2 / 7
असं असले तरी, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर ८९,९९० रुपयांचं निश्चित आणि हमीसह व्याज मिळेल.
3 / 7
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरील व्याजदर आरबीआयच्या रेपो रेटवर अवलंबून नसतात. हे दर अर्थ मंत्रालयामार्फत ठरवले जातात, ज्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन गरजेनुसार बदल केला जातो. पोस्ट ऑफिसचे सर्व कामकाज भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते.
4 / 7
यामुळे या योजना केवळ सुरक्षितच नाहीत, तर त्यावर सरकारी गॅरंटीसह निश्चित व्याजही मिळतं. सध्या पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना 'टाईम डिपॉझिट' (TD) योजनेवर ६.९ टक्क्यांपासून ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
5 / 7
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टीडी खातं उघडता येत. १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसची ही टीडी योजना बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच काम करतं. यामध्ये एका ठराविक काळानंतर तुम्हाला निश्चित व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते.
6 / 7
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टीडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण २,८९,९९० रुपये मिळतील. यामध्ये ८९,९९० रुपये हे केवळ निश्चित व्याजाचे असतील.
7 / 7
विशेष म्हणजे, सध्या देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत नाही. मात्र, पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्व वयोगटातील ग्राहकांना समान व्याज मिळते, तर बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही निवडक कालावधीच्या एफडीवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज दिलं जातं.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा