जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:53 IST
1 / 8दिल्लीचे खान मार्केट जगातील सर्वात महागड्या हाय-स्ट्रीट रिटेल ठिकाणांच्या यादीत एका पायरीने घसरून २४ व्या स्थानावर पोहोचले आहे. मात्र, ते देशातील सर्वात महागडे हाय-स्ट्रीट मार्केट अजूनही कायम आहे.2 / 8खान मार्केटमधील वार्षिक भाडे सध्या १९,७४९ प्रति चौरस फूट (२२३ डॉलर) एवढे आहे. हे भाडे भारतातील इतर कोणत्याही हाय-स्ट्रीटपेक्षा जास्त आहे.3 / 8लंडनची 'न्यू बॉन्ड स्ट्रीट' जगातील सर्वात महागडी रिटेल डेस्टिनेशन बनली आहे, जिथे वार्षिक भाडे सुमारे १,९७,६६८ रुपये प्रति चौरस फूट (२,२३१ डॉलर) आहे.4 / 8न्यू बॉन्ड स्ट्रीट नंतर मिलानची 'विया मोंटे नेपोलेओने' (सुमारे ₹१,९३,१४४ प्रति चौरस फूट) दुसऱ्या, तर न्यूयॉर्कची 'अपर फिफ्त अव्हेन्यू' (सुमारे ₹१,७७,१४० प्रति चौरस फूट) तिसऱ्या स्थानावर आहे.5 / 8मर्यादित मॉल पुरवठ्यामुळे, खान मार्केट, कनॉट प्लेस आणि गुरुग्राममधील गॅलेरिया मार्केट यांसारखी हाय-स्ट्रीट ठिकाणे आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रँड्ससाठी महत्त्वाची केंद्रे बनत आहेत.6 / 8एशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारतातील टियर-१ शहरांमध्ये भाड्यामध्ये सर्वात वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये गुरुग्रामच्या गॅलेरिया मार्केटमध्ये २५% वाढ, दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये १४% वाढ आणि मुंबईच्या केंप्स कॉर्नरमध्ये १०% वाढ झाली आहे.7 / 8ट्रॅक केलेल्या १६ भारतीय हाय-स्ट्रीट लोकेशन्समध्ये सरासरी वार्षिक भाडे वाढ ६% एवढी नोंदवली गेली आहे, जी प्रीमियम रिटेल मागणी वाढल्याचे स्पष्ट संकेत देते.8 / 8विशेष म्हणजे, एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात स्वस्त हाय-स्ट्रीट देखील भारतातच आहे. चेन्नईच्या अन्ना नगर सेकंड अव्हेन्यू येथे वार्षिक भाडे मात्र केवळ २,२१४ रुपये प्रति चौरस फूट (२५ डॉलर) आहे.