शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात पुन्हा केली वाढ, किती महिन्याचा मिळणार फरक?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:41 PM

1 / 9
तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या अशा कर्मचार्‍यांसाठी ज्यांना ५ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो, सरकारने डीएमध्ये प्रचंड वाढ केली आहे.
2 / 9
कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये १६% ची बंपर वाढ करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डीएचा दर सध्या मूळ वेतनाच्या ३९६% होता. बदलानंतर, डीए आता मूळ वेतनाच्या ४१२ टक्के करण्यात आला आहे.
3 / 9
सरकारने केलेला बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह सहा महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
4 / 9
वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाच्या वतीने असे सांगण्यात आले की केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) चा दर सध्याच्या ३९६% वरून ४१२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 / 9
५ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार ३९६ %. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये, केंद्र आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांसाठी सहाव्या वेतन आयोगांतर्गत DA चा दर २१२% वरून २२१% पर्यंत वाढवण्यात आला होता.
6 / 9
सध्या केंद्र सरकार ७ व्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या ४२ टक्के महागाई भत्ता देत आहे.
7 / 9
७व्या वेतन आयोगांतर्गत यापूर्वी ४ टक्के वेतनवाढ होते, ती वाढून ४२ टक्के झाली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली. आता पुढील महागाई भत्ता केंद्र सरकार ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये जाहीर करणार आहे.
8 / 9
यावेळीही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे मूळ वेतनाच्या ४६ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.
9 / 9
ऑक्टोबरमध्ये करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा १ जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही तीन ते चार महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी