मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:27 IST
1 / 8संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये, ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेदरम्यान, काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुड्डा यांनी सोमवारी एक मोठं विधान केलं, ज्यामुळे अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड्सची सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 2 / 8हुड्डा म्हणाले की, 'डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा, नाहीतर देशातील मॅकडोनाल्ड्स बंद करा.' हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून, लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.3 / 8ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, दीपेंदर सिंग हुड्डा यांनी पाकिस्तानला धारेवर धरले. याच वेळी, ट्रम्प यांनी दिलेल्या युद्धबंदीच्या विधानाचा त्यांनी निषेध केला. 'डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प करा, त्यांचं तोंड बंद करा, अन्यथा भारतातील मॅकडोनाल्ड्स बंद करा,' असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, या अमेरिकन बर्गर बनवणाऱ्या कंपनीचा व्यवसाय किती मोठा आहे आणि या विधानाचा कंपनीवर काही परिणाम होईल का?4 / 8मॅकडोनाल्ड्स ही जगातील सर्वात मोठ्या अन्न साखळींपैकी एक आहे. अमेरिकेबाहेर आज त्यांचे सुमारे ७१ देशांमध्ये आउटलेट आहेत. १९४० मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती. 5 / 8जर आपण तिच्या सध्याच्या बाजार मूल्याबद्दल बोललो, तर ते सुमारे २१३.४२ अब्ज डॉलर्स (सुमारे १८ लाख कोटी रुपये) इतके प्रचंड आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे.6 / 8कंपनीचे सध्याचे सीईओ आणि अध्यक्ष ख्रिस्तोफर जॉन केम्पझिन्स्की आहेत, जे २०१९ पासून कंपनीचे प्रमुख आहेत. ही जगातील ७१ वी सर्वात मौल्यवान कंपनी असून, फास्ट फूड उद्योगात ती आघाडीवर आहे. भारतासारख्या देशांमध्येही त्यांचे मजबूत अस्तित्व असून ती हजारो लोकांना रोजगार देते.7 / 8खासदार दीपेंदर सिंग हुड्डा यांच्या विधानानंतर, लोक सोशल मीडियावर कंपनीबद्दल अनेक तर्कवितर्क लावत आहेत. काही जण कंपनी बंद करण्याच्या मागणीमुळे तिच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असं म्हणत आहेत. 8 / 8मात्र, आतापर्यंत सरकारने मॅकडोनाल्ड्स किंवा त्यांच्या भारतातील आउटलेट बंद करण्याबाबत कोणतंही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. त्यामुळे, सध्या तरी कंपनी बंद होण्याची शक्यता नाही.