By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:00 IST
1 / 8काय आहे हे 'कॉफिन लाउंज'? जपानमध्ये 'कुयो' नावाची एक परंपरा आहे, ज्याचा अर्थ 'मेमोरियल सर्व्हिस' असा होतो. याच परंपरेचा आधार घेत कंपन्यांनी आता 'कॉफिन-लाइंग' सर्विस सुरू केली आहे.2 / 8ज्यांना आपल्या जीवनातील ताणतणाव आणि भिती कमी करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा 'मेडिटेशन'चा (ध्यान) प्रकार मानला जात आहे. मरणाचा अनुभव घेतल्याने जीवनाची किंमत अधिक कळते, असा कंपनीचा दावा आहे.3 / 8टोक्योमधील 'मीसो कुकन कनोके-इन' सारख्या स्पा सेंटरमध्ये साध्या लाकडी पेटीऐवजी आता रंगीबेरंगी आणि 'क्यूट' वाटणाऱ्या शवपेटी डिझाइन्स उपलब्ध आहेत, जेणेकरून लोकांना भितीऐवजी शांत वाटेल.4 / 8'ग्रेव टोक्यो' नावाची कंपनी विशेष डिझाइन केलेले शवपेटी तयार करत आहे. या पेटीमध्ये लोक स्वतःची पर्सनालिटी आणि आवडीनुसार निवड करू शकतात.5 / 8या सेवेसाठी कंपन्यांकडून दर ३० मिनिटांसाठी साधारण १३ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार १२०० रुपये आकारले जात आहेत. ही सेवा सध्या जपानमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे.6 / 8जपानमध्ये वाढत्या आत्महत्येच्या घटना आणि मानसिक तणाव पाहता, अनेक कंपन्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अशा प्रकारचे क्रिएटिव्ह उपाय शोधत आहेत.7 / 8ग्राहकांसाठी केवळ साधी शवपेटी नाही, तर त्यांना शांत वाटण्यासाठी मंद संगीत, छतावर प्रोजेक्टरद्वारे व्हिडिओ पाहण्याची सुविधा किंवा पूर्ण शांततेत राहण्याचा पर्यायही दिला जातो.8 / 8तुम्हाला या अनुभवासाठी पूर्णपणे शवपेटी बंद करून घ्यायची आहे की अर्धी उघडी ठेवायची आहे? याचे स्वातंत्र्यही ग्राहकांना दिले जाते. स्वतःला ताणमुक्त करण्यासाठी अनेक जण या संधीचा फायदा घेत आहेत.