By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:40 IST
1 / 10१० लाखांच्या कर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकांच्या व्याजदरात तुलना करणे फायदेशीर ठरते.2 / 10कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यांचा सिबिल स्कोर ८०० पेक्षा जास्त आहे, त्यांना बँका सर्वात कमी व्याजदराने कर्ज देण्यात प्राधान्य देतात.3 / 10कर्जाची मंजुरी केवळ सिबिलवर अवलंबून नसते, तर तुमचे वय, मासिक उत्पन्न आणि सध्या सुरू असलेले इतर कर्ज यांचाही बँक विचार करते.4 / 10जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल, तर बँक तुम्हाला कर्ज नाकारू शकते किंवा जास्त व्याजदराने कर्ज देऊ शकते.5 / 10स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या नवीन कारसाठी ८.९०% या सुरुवातीच्या व्याजदराने ऑटो लोन ऑफर करत आहे.6 / 10खाजगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी सध्या ९% या सुरुवातीच्या व्याजदराने कार लोन उपलब्ध करून देत आहे.7 / 10बँक ऑफ बडोदा सध्या सर्वात कमी म्हणजेच ८.५०% (फिक्स्ड रेट) दराने कार लोन देत आहे.8 / 10जर तुम्ही एसबीआयकडून १० लाखांचे कर्ज ५ वर्षांसाठी घेतले, तर तुमचा मासिक हप्ता २०,७१० रुपये बसेल आणि एकूण व्याज २,४२,५९१ रुपये भरावे लागेल.9 / 10एचडीएफसी बँकेतून याच रकमेसाठी तुमचा हप्ता २०,७५८ रुपये असेल आणि ५ वर्षांत तुम्हाला २,४५,५०१ रुपये व्याज द्यावे लागेल.10 / 10बँक ऑफ बडोदामध्ये सर्वात कमी २०,५१७ रुपये हप्ता बसेल. येथे ५ वर्षात तुम्हाला २,३०,९९२ रुपये व्याज भरावे लागेल, जे इतर दोन बँकांच्या तुलनेत कमी आहे.