By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:54 IST
1 / 6दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची नेटवर्थ डिसेंबर २०२५ मध्ये ४५,७९३.२ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या Canara Bank, Fortis Healthcare आणि Titan Company अशा अनेक शेअर्सनी सर्वाधिक नफा मिळवून दिला आहे. 2 / 6रेखा झुनझुनवाला यांनी या कंपन्यांचे शेअर्स खूप पूर्वी कमी किमतीत विकत घेतले होते. आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक मूल्य याच शेअर्सचं आहे. चला तर मग जाणून घेऊया झुनझुनवाला यांच्याकडे कोणत्या कंपनीचे किती शेअर्स आहेत.3 / 6दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक स्टॉक व्हॅल्यू 'टायटन'ची आहे. रेखा झुनझुनवाला यांचा टाटा समूहाच्या या कंपनीत ५.३% हिस्सा आहे. झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे एकूण ४.७२ कोटींहून अधिक शेअर्स आहेत, ज्यांची एकूण होल्डिंग व्हॅल्यू १९,८४८.६ कोटी रुपये सांगितलं जात आहे. कंपनीचा शेअर शुक्रवार, १६ जानेवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ०.६४% च्या किरकोळ घसरणीसह ४,१९४ रुपयांवर बंद झाला. कंपनीचं मार्केट कॅप ३.७२ लाख कोटी रुपये आहे. गेल्या एक महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये ७.३३% ची तेजी दिसून आली आहे.4 / 6फेडरल बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा २.४% हिस्सा आहे. त्यांच्याकडे एकूण ५,९०,३०,०६० शेअर्स असून त्यांचं एकूण होल्डिंग व्हॅल्यू १,५९५.३ कोटी रुपये आहे. बँकेचा शेअर शुक्रवारी ९.६८% च्या मोठ्या वाढीसह २७०.७५ रुपयांवर बंद झाला. गेल्या एक महिन्यात बँकेचा स्टॉक २.७१% पर्यंत वाढला आहे. बँकेचं मार्केट कॅप ६६.४४ हजार कोटी रुपये आहे.5 / 6फोर्टिस हेल्थकेअर कंपनीमध्ये रेखा झुनझुनवाला यांचा ४% हिस्सा आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ३,०३,५०,१५२ शेअर्स आहेत, ज्यांची एकूण किंमत २,७२०.७ कोटी रुपये आहे. कंपनीचा स्टॉक शुक्रवारी १.३१% घसरणीसह ८९८ रुपयांवर बंद झाला. गेल्या एक महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये ३.११% ची वाढ पाहायला मिळाली. कंपनीचं मार्केट कॅप ६७.६५ हजार कोटी रुपये आहे.6 / 6झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेचे १३,९९,१८,००० शेअर्स आहेत, जे सुमारे १.५% इतकं आहेत. या शेअर्सचं एकूण मूल्य २,१९८.५ कोटी रुपये आहे. बँकेचा शेअर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी २.०४% वाढीसह १५७ रुपयांवर बंद झाला. गेल्या १ महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये ४.५४% ची वाढ झाली आहे. बँकेचं मार्केट कॅप १.४२ लाख कोटी रुपये आहे.