शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या कमाईची संधी, वर्षाच्या सुरुवातीपासून करा तयारी; पगारासोबत मिळवा अतिरिक्त 'Income'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:04 IST

1 / 10
काही बिझनेस आयडिया, ज्या महिलांसह पुरुषही या वर्षीच्या सुरुवातीपासून कमीत कमी गुंतवणूक करून सहज सुरू करू शकता. विशेष म्हणजे ही कामे तुम्ही घरबसल्या किंवा नोकरीसोबत अतिरिक्त कमाई म्हणूनही करू शकाल.
2 / 10
नवीन वर्षी लोक नव्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी तयार असतात. ज्यात कमी कालावधीत उद्योग नावारुपाला येऊ शकतो आणि काही महिन्यातच चांगल्या कमाईचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. फक्त यासाठी तुम्हाला मेहनत करणे आणि सातत्य राखणे गरजेचे आहे.
3 / 10
जर तुम्हाला मेकअप, फेशियल अथवा ब्यूटी पार्लरसारख्या कामात रस असेल तर सुरुवातीला तुम्ही फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग आणि सिंपल मेकअपसारख्या सर्व्हिस देऊन काम सुरू करू शकता. यासाठी प्रशिक्षण आणि बेसिक सामानासह तुम्ही काही महिन्यात ग्राहकांना सेवा देत चांगली कमाई करू शकता.
4 / 10
सध्या यूनिक आणि हँडमेड गिफ्ट लोकांना खूप आवडतात. जर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल तर हँडमेड गिफ्टचं काम करण्याचा पर्याय आहे. त्यात होम डेकोर आयटम, पर्सनलाइज्ड गिफ्ट, फोटो फ्रेम अथवा फेस्टिव्ह सजावटीचं सामान तयार करू शकता. सोशल मिडिया आणि ऑनलाईन माध्यमातून ऑर्डरही मिळतात. तुमचे काम लोकांना आवडले तर त्यातून तुम्हाला कमाईही होते.
5 / 10
जर तुमच्या हातच्या जेवणाची चव इतरांना आवडत असेल तर तुम्ही क्लाउड किचनही सुरू करू शकता. ना तुम्हाला मोठे रेस्टॉरंट उघडण्याची गरज आहे, ना स्टाफ ठेवण्याची आवश्यकता आहे. घरातून किचन सेटअप करून ऑनलाईन फूड APP च्या माध्यमातून ऑर्डर घेऊ शकता. सुरुवातीला मर्यादित मेन्यू ठेवा, ग्राहकांना चांगली सेवा द्या. काही महिन्यात यातही तुम्ही चांगली कमाई करू शकता.
6 / 10
सध्या घरातून बेकिंग बिझनेस खूप ट्रेंडमध्ये आहे. कारण घरात बनवलेले केक आणि कुकीज खाणे लोकांना आवडते. कमी खर्चात ओवन आणि आवश्यक सामान घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. बर्थ डे, सण उत्सव याठिकाणी ऑर्डर मिळेल. सोशल मीडियावर तुमच्या प्रोडक्टचे प्रमोशन करा. चव चांगली असेल तर ग्राहक तुमच्याकडे जोडला जाईल.
7 / 10
तुम्हाला शिवणकाम येत असेल तर त्यातही गुंतवणूक करून तुम्ही महिलांसाठी ब्लाऊज, सूट अथवा मुलांसाठी कपडे शिवण्याचा व्यवसाय करू शकता. घरातच शिलाई मशिन लावून काम सुरू करू शकता. सुरुवातीला तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि परिचयांमध्ये ऑर्डर घ्या. तुमचे नाव होईल त्यातून इतरही ऑर्डर तुम्हाला मिळू शकतात.
8 / 10
शहरात कामाला आलेले लोक आणि विद्यार्थी कायम घरच्यासारखं जेवण मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. त्यात टिफिन सर्व्हिस हा बिझनेस फायदेशीर आहे. जर तुम्ही स्वच्छ आणि स्वादिष्ट जेवण बनवू शकता तर त्याची सुरुवात घरातून करा. ५-१० लोकांना टिफिन बनवून काम सुरू करा. त्यात खर्चही कमी असतो आणि महिन्याची कमाईही निश्चित असते.
9 / 10
तुम्हाला कपड्यांची चांगली समज असेल तर ऑनलाईन कपडे विकून तुम्ही काम सुरू करू शकता. तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून साडी, कुर्ती आणि ड्रेस विकू शकता. सुरुवातीला कमी स्टॉक ठेवा आणि ऑर्डर मिळाल्यानंतर सामान मागवा. घरातून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ग्राहकांची संख्या वाढेल तसे तुम्हाला स्टॉक आणखी वाढवावा लागेल.
10 / 10
अगरबत्ती, मेणबत्ती यांची मागणी कायम असते. घरात कमी खर्चात हा उद्योग सुरू करू शकता. बाजारात कच्चा माल मिळतो. सुरुवातीला छोट्या प्रमाणात उत्पादन करून किरकोळ दुकानदारांना तो माल विकू शकता. सण उत्सवात याची मागणी जास्त असते. मेहनत आणि सातत्य राखले तर यातूनही चांगली कमाई होऊ शकते.
टॅग्स :businessव्यवसायjobनोकरी