शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:36 IST

1 / 6
सोन्याशिवाय भारतीयांचं पानही हलत नाही, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फुटका मनी का होईना पण भारतीय महिलेच्या गळ्यात सोन्याचा एकतरी दागिना असतो. शिवाय सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजला जातो. २०२४ या वर्षात सोन्याने शेअर मार्केट पेक्षाही जास्त परतावा दिला आहे. परिणामी सोन्यातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे.
2 / 6
सध्या सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. अशा वेळी सोने खरेदी करणे किंवा विकणे योग्य आहे का, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. या बातमीतील अनेक मुद्द्यांच्या आधारे हे जाणून घेऊ.
3 / 6
आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत ८२,०९४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर चांदीची किंमत ९२,४७५ रुपये प्रति किलो आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये, सरकारने आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याच वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्यात आयात शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहे.
4 / 6
सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते जी महागाईच्या काळात त्याचे मूल्य टिकवून ठेवते. जेव्हा इतर मालमत्तेच्या किंमती कमी होतात तेव्हा सोन्याच्या किमती अनेकदा वाढतात. त्याचबरोबर सोन्याच्या किमती जागतिक बाजारावर अवलंबून असतात. जागतिक स्तरावर अनिश्चितता किंवा आर्थिक संकट आल्यास सोन्याची मागणी वाढते आणि त्याचे मूल्य वाढते. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोने हा एक चांगला पर्याय असू शकतो.
5 / 6
तुम्हाला सोन्यातून अल्पावधीत नफा कमवायचा असेल तर तुम्ही बाजारातील चढउताराचा फायदा घेऊ शकता. जर तुम्ही कमी किंमतीला सोने खरेदी केले असेल आणि आता किंमत वाढली असेल, तर विक्रीसाठी ही योग्य वेळ असू शकते.
6 / 6
याशिवाय जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होत असेल किंवा तुम्हाला लगेच पैशांची गरज असेल तर जुने सोने विकणे हा एक पर्याय असू शकतो. जर तुमचा बराचसा पोर्टफोलिओ सोन्यात गुंतवला असेल, तर तो विकून इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरू शकते.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूकBudgetअर्थसंकल्प 2024Budget 2025अर्थसंकल्प २०२५