शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNLची स्वातंत्र्य दिन ऑफर, केवळ २७५ रुपयांत मिळताहेत हे महागडे प्लॅन्स, वर ७५ दिवसांची व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 4:42 PM

1 / 5
बीएसएनएलने स्पेशल इंडिपेन्डेंस डे ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने आपले दोन ब्रॉडबँड प्लॅन ४४९ रुपये आणि ५९९ रुपये हे कमी किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. विशेष ऑफरमध्ये हे प्लॅन केवळ २७५ रुपयांना उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे या दोन्ही प्लॅन्सना ७५ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. तसेच बीएसएनएलने अजून एक ऑफर लॉन्च केली आहे. ती ९९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आहे. जाणून घेऊयात Independence Days 2022 साठी बीएसएनएलने दिलेल्या विशेष ऑफरबाबत...
2 / 5
बीएसएनएलने ४४९ रुपये आणि ५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅनला केवळ २७५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. याचा अर्थ बीएसएनएल ३२४ रुपयांपर्यंत सवलत देत आहे. या प्लॅनच्या किमतीत कपात करण्यात आली असली तरी ऑफरमध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नाही.
3 / 5
दोन्ही ब्रॉडबँड प्लॅनची व्हॅलिडिटी ७५ दिवस एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर युझर्सना निवडलेल्या प्लॅनच्या हिशेबाने भरणा करावा लागेल.
4 / 5
महत्त्वाची बाब म्हणजे बीएसएनएल स्वातंत्र्य दिन २०२२ ऑफर केवळ नव्या ग्राहकांना लागू करण्यात आली आहे. बीएसएनएल ग्राहकांना केवायसीच्यादरम्यान, ऑफऱ प्लॅन निवडण्याची परवानगी देईल.
5 / 5
४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३०एमबीपीएस हायस्पीड डेटासह ३.३टीबी मासिक डेटाचाही समावेश आहे. तर ५९९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० एमबीपीएस हायस्पीडसह ३.३ टीबी डेटा मिळतो. युझर्सना ७५ दिवसांसाठी ७७५ रुपयांच्या रिचार्जसह युझर्सना ९९९ प्लॅनचा लाभ मिळेल. युझर्सना यामध्ये Disney+ Hotstar, Hungama, Sony LIV, ZEE5, Voot, Yupp TV आणि Lionsgate सब्स्क्रिप्शनसह १५० एमबीपीएसच्या स्पीडसह २टीबी डेटा मिळेल.
टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल