शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Elon Musk : "मी सुद्धा न्यूड मॉडल्ससोबत एन्जॉय करु शकतो, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 4:40 PM

1 / 10
टेस्ला मोटर्स आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलन मस्क हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. तसेच, जगातील श्रीमंत व्यावसायिकांमध्ये त्यांचाही समावेश आहे. मात्र, मस्क यांच्याशी संबंधित एका नवीन पुस्तकात असा दावा केला आहे की, वर्कलोडच्यावेळी मस्क यांचा पारा चढलेला दिसून आला आहे. त्यांनी अनेकदा आपल्या कर्मचाऱ्यांवर राग काढला आहे.
2 / 10
पॉवर प्ले: टेस्ला, एलन मस्क अँड द बेट ऑफ द सेंचुरी हे पुस्तक वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर टीम हिगिन्स यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असे लिहिले आहे की, 2016 मध्ये मस्क यांनी ओव्हरटाइम केलेल्या कर्मचाऱ्यांना म्हटले की, प्रायव्हेट आयलँडवर न्यूड सुपरमॉडल्ससोबत वेळ घालवताना मी सुद्धा ड्रिंक घेऊ शकतो, पण मी हे करत नाही, त्यामुळे तुम्हालाही तक्रार करण्याचा अधिकार नाही.
3 / 10
काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वीकेंड्सला सुद्धा काम करावे लागते आणि त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे, असे टेस्ला एक्सचे व्हाइस प्रेसिडेंटने मस्क यांना म्हटले. यावर मस्क म्हणाले होते की, मी सुद्धा या कारखान्यात रात्रंदिवस काम करत आहे, त्यामुळे इतर लोक किती मेहनत करत आहेत, हे सांगण्याची गरज नाही.
4 / 10
या पुस्तकानुसार, ही घटना टेस्ला मॉडेल एक्स एसयूव्हीच्या निर्मितीच्यावेळी घडली. मस्क हे 2016 मध्ये व्यावसायिक इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांच्यावर खूप दबाव होता.
5 / 10
त्या काळात मस्क आपल्या कंपनीच्या इंजीनिअर्सवरही चिडले आणि म्हणाले की, तुमचे काम पूर्णपणे बकवास आहे. तसेच, मस्क यांनी एका इंजीनिअरला म्हटले होते, 'मी तुला कंपनीतून काढून टाकले आहे.'
6 / 10
या पुस्तकात असेही म्हटले आहे की, मस्क त्यावेळेस सुपरस्टार अभिनेत्री एंबर हर्ड हिच्या प्रेमात पडले होते. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढूनही ते काही तासांसाठी ऑस्ट्रेलियाला उड्डाण करत होते, त्याठिकाणी एंबर हर्ड आपल्या एक्वामॅन फिल्मचे शूटिंग करत होती. मात्र, मस्कसाठी हे खूपच आव्हानात्मक होते. एंबर हर्ड सध्या सुपरस्टार अभिनेता जॉनी डेपसोबत घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहे.
7 / 10
याचबरोबर, 2007 मध्ये मस्क आपल्या लक्झरी कार रोडस्टरच्या निर्मितीबद्दल इतका चिडला की, त्यांनी टेस्लाचे सह-संस्थापक मार्टिन एबरहार्डला म्हटले की, आपल्या टीमच्या सर्व सदस्यांना काढून टाकाले पाहिजे. मात्र, मार्टिन यांनी असे केले नाही तरी त्यांनी त्याची किंमत मोजावी लागली.
8 / 10
मस्क यांनी या नंतर मार्टिन यांना एक ऑफर दिली होती. जर त्यांनी आजच कंपनी सोडली तर त्यांना 6 महिन्यांचा पगार आणि 2.5 लाख शेअर्स खरेदी करण्याची संधी दिली जाईल, पण जर त्यांनी हे केले नाही तर त्यांना काहीही मिळणार नाही. त्यानंतर मार्टिन यांनी या डीलवर साइन केली. या पुस्तकावर मस्क यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
9 / 10
मस्क यांनी टिम यांचे पुस्तक नाकारले आणि ट्विट केले की, त्यांच्या या पुस्तकात फक्त खोटे लिहिलेले आहे. तसेच, हे पुस्तक खूप कंटाळवाणे आहे.
10 / 10
दरम्यान, मस्क यांनी एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, त्यांना अल्ट्रा हार्डकोर असणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही उद्योगात क्रांती करणे ही केवळ कमकुवत मनाच्या व्यक्तीची बाब नाही, असेही या पुस्तकात एका ठिकाणी हे देखील लिहिले आहे.
टॅग्स :businessव्यवसायInternationalआंतरराष्ट्रीय