मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:59 IST
1 / 9दिवाळीच्या धामधुमीत आणि गोवर्धन पूजेच्या शुभ मुहूर्तावरच आज सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटताना दिसत आहे. आज या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तब्बल १२ वर्षांतील विक्रमी घसरणीनंतर, आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव आपटल्याचे चित्र आहे.2 / 9आज गोवर्धन पूजेच्या दिवशी चांदीची किंमत झटक्यात १०५४९ रुपयांनी घसरली. तर सोन्याच्या दरातही ३७२५ रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.3 / 9या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह १२७६२४ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी जीएसटीसह १५७०७६ रुपये प्रति किलोवर आली आहे. मिंटनुसार, 22 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 128410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी ₹150490 कि.ग्रॅमवर होती.4 / 9एवढ्या मोठ्या घसरणीचे कारण काय? - सोन्या-चांदीच्या दरातील या मोठ्या घसरणीमागे एक नव्हे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. जसे की, अमेरिका आणि चीनमधील सकारात्मक व्यापार चर्चा, डॉलरची मजबूती, तांत्रिक दष्ट्या दर प्रचंड वाढले होते. या शिवाय भारतातील हंगामी मागणी कमी होणे, ही प्रमुख कारणे आहेत.5 / 9इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २० ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १२७६३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर, चांदीही जीएसटीशिवाय १६३०५० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. 6 / 9आज, सोने जीएसटीशिवाय १२३९०७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने उघडले, तर चांदी १५२५०१ रुपये दराने उघडली. आतापर्यंत (ऑक्टोबर महिन्यात) सोन्याच्या दरात ८५५८ रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलो १००६७ रुपयांची वाढ झाली आहे.7 / 9कॅरेट निहाय सोन्याचा दर - आज २३ कॅरेट सोन्याचा दरही ३४१३ रुपयांनी स्वस्त होऊन १२३४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. जीएसटीसह याची किंमत आता १२७११३ रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्ज जोडलेले नाही.8 / 9२२ कॅरेट सोन्याची किंमत २७९५ रुपयांनी कमी होऊन ११३४९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत १,१६,९०३ रुपये आहे. तर १८ कॅरेट सोने २७९५ रुपयेच्या घसरणीसह ९२९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह ते ९५७१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.9 / 9२२ कॅरेट सोन्याची किंमत २७९५ रुपयांनी कमी होऊन ११३४९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत १,१६,९०३ रुपये आहे. तर १८ कॅरेट सोने २७९५ रुपयेच्या घसरणीसह ९२९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह ते ९५७१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.