By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:42 IST
1 / 8गुंतवणूकदारांसाठी सध्या मुथूट कॅपिटल हा सर्वात आकर्षक पर्याय ठरत आहे. ३६ महिन्यांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ९.१०% तर ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ९.३५% व्याज मिळत आहे.2 / 8या बँकेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. इथे सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही श्रेणीतील गुंतवणूकदारांना ७.९०% दराने व्याज दिले जात आहे.3 / 8उत्तम परतावा शोधणाऱ्यांसाठी स्लाइस स्मॉल फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे. ही संस्था सध्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी ७.७५% व्याजदर ऑफर करत आहे.4 / 8श्रीराम फायनान्स येथे सामान्य ग्राहकांना ७.६०% व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ८.१०% इतका आहे. सुरक्षित आणि स्थिर परताव्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.5 / 8शिवालिक स्मॉल फायनान्स या बँकेत सामान्य ग्राहकांना ७.५५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.०५% व्याजदर दिला जात आहे. एफडीसाठी हा देखील एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो.6 / 8बजाज फायनान्स ही एक नामांकित एनबीएफसी संस्था असून येथे सामान्य ग्राहकांना ६.९५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% दराने व्याज मिळत आहे.7 / 8तुम्ही तुमची एफडी बँका किंवा मुथूट, श्रीराम आणि बजाज यांसारख्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये करू शकता. अनेकदा बँकांपेक्षा एनबीएफसी अधिक व्याज ऑफर करतात.8 / 8जास्त व्याजदरासोबतच त्या संस्थेची विश्वासार्हता आणि कालावधी तपासणे महत्त्वाचे आहे. ९.३५% पर्यंत व्याज मिळवून तुम्ही तुमच्या बचतीवर मोठी वाढ मिळवू शकता.