Success Story: BA पास मुलानं उभी केली कोट्यवधींची कंपनी, बनला ग्रीटिंग कार्ड्स बिझनेसचा बादशाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 10:34 IST
1 / 8Success Story Archies: १९७९ साली दिल्लीतील एका १९ वर्षाच्या मुलानं साँग बुक बनवण्याचं काम सुरू केलं. हा मुलगा साधा पदवीधर होता. हळूहळू हा व्यवसाय वाढू लागला आणि पुढे त्याचे ग्रीटिंग कार्ड व्यवसायात रूपांतर झालं. हळूहळू ग्रीटिंग कार्ड्सनं तरुणांची मनं जिंकली. त्यांनं व्यावसायिक जगतात एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.2 / 8तुमच्यापैकी अनेकांनी आर्चीजमधून ग्रीटिंग्ज कार्ड्स किंवा गिफ्ट्स खरेदी केल्या असतील किंवा घेतल्या असतील. आज हा एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे आणि त्यांची स्टोअर्स मोठ्या महानगरांमध्ये तसेच अनेक टियर २ शहरांमध्ये उपलब्ध आहेत. पण तुम्हाला ती सुरू होण्यामागची कहाणी माहीत आहे का? पाहूया अनिल मूलचंदानी यांनी ही कंपनी कशी सुरू केली.3 / 8बिझनेसमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली होती, पण अनिल यांना कंपनीसाठी फ्लॅगशिप प्रॉडक्ट लॉन्च करायचे होते. त्यामुळेच त्यांनी ग्रीटिंग कार्ड्स बनवण्याचा निर्णय घेतला. १९८३ मध्ये त्यांनी कार्ड्स विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी होळी, दिवाळी, राखी आणि नवीन वर्षासाठी कार्ड बनवले. 4 / 8ही लवकरच कंपनीची ओळख बनली आणि खूप हिट झाली. कंपनीनं व्हॅलेंटाईन डे कार्ड देखील बाजारात आणले आणि ते यशस्वी देखील झाले. 5 / 8१९८७ मध्ये, कंपनीचं पहिलं फ्लॅगशिप स्टोअर कमला नगर, दिल्ली येथे सुरू झालं. नंतर कंपनीने इतर शहरांमध्येही आपली उपस्थिती वाढवली. १९९५ मध्ये ती पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन झाली.6 / 8१९९९ मध्ये अनिल यांचा मुलगा वरुण मूलचंदानी यांनी कंपनी जॉईन केली. सध्या ते कंपनीचा कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीत शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयआयएलएम विद्यापीठातून बीबीएचं शिक्षण घेतलं. त्यांच्या देखरेखीखाली कंपनीनं नवीन उंची गाठली.7 / 8२००६ मध्ये कंपनीच्या टर्नओव्हरनं १०० कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला होता. आज कंपनीचं मूल्यांकन अंदाजे ८९ कोटी रुपये आहे. कोविडच्या काळात गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाचं खूप नुकसान झालं आणि कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागलं असलं तरी, कंपनी त्यातून सावरण्यासाठी आणि नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाली आहे.8 / 8अलीकडेच कंपनीने आपला मॅस्कॉट देखील लॉन्च केला आहे. याचं नाव एम्मा असं आहे. आता कंपनीला नव्या जनरेशनच्या मुलांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यांच्या मागणीनुसार उत्पादनं बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे.