SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा
By जयदीप दाभोळकर | Updated: August 7, 2021 13:00 IST
1 / 13२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते e RUPI हे व्हाऊचर लाँच करण्यात आलं होतं. कॅशलेस आणि संपर्क रहित रकमेचा भरणा करण्यासाठी e RUPI लाँच करण्यात आलं.2 / 13e RUPI मूळत: एक प्रकारचं डिजिटल व्हाऊचर आहे, जे लाभार्थींना त्यांच्या फोवर एसएमएस किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून मिळते.3 / 13हे एक प्रकारचं प्रीपेड व्हाऊचर आहे, जे लाभार्थी कोणत्याही केंद्रावर, जे e RUPI स्वीकारतात अशा ठिकाणी जाऊन त्याचा वापर करू शकतात. 4 / 13नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं e RUPI साठी ११ बँकांशी करार केला आहे. यामध्ये अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. 5 / 13याशिवाय इंडियन बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकांचाही समावेश करण्यात आला आहे. 6 / 13याचा स्वीकार करणाऱ्या अॅप्समध्ये भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लॅब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनी एसबीआय मर्चंट पे यांचा समावेश आहे. यामध्ये लवकर e RUPI स्वीकारणाऱ्या आणि अधिक बँकांच्या अॅप्सचा समावेश होणार आहे.7 / 13e RUPI साठी लाभार्थींकडे बँक खातं असणं आवश्यक नाही, सुरक्षेच्या दृष्टीनं यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ययामध्ये वैयक्तिक माहिती देण्याचीही गरज भासत नाही.8 / 13e-RUPI हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NCPI नं विकसित केलं आहे. e-RUPI हे एक प्रकारचं कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस साधन आहे. हे एक QR कोड अथवा SMS स्ट्रिंग बेस्ड ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींना मोबाईलवर पाठवलं जातं.9 / 13हे सर्व्हिस प्रोव्हायडरला कोणत्याही मध्यस्थीशिवाय आणि कोणत्याही भागीदारीच्या वेळी पेमेंट करेल. e-RUPI एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल सेवा आहे. सेवा देणाऱ्यांना आणि लाभार्थींना डिजिटलीच पैसे पाठवण्याची सुविधा याद्वारे मिळते.10 / 13यामध्ये निरनिराळ्या योजनांची लिंकप्रुफ डिलिव्हरीही करता येते. तसंच हे एक क्युआर कोड एसएमएस स्ट्रिंग आधारीत ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींच्या मोबाईलवर पोहोचवता येतं. याद्वारे वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग अॅक्सेसशिवाय व्हाऊद्वारे पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.11 / 13e-RUPI कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांसह सेवांच्या प्रायोजकांना जोडते. e-RUPI कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांसह सेवांच्या प्रायोजकांना जोडते.12 / 13नियमित पैशांच्या देवाणघेवाणीशिलाय याचा वापर आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, सब्सिडीसारख्या योजना, मातृत्व आणि बालकल्याण योजना, औषधं आणि रुग्णांचा तपास आदी सेवांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.13 / 13या व्हाऊचरचा उपयोद खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याद्वारे कल्याण आणि कॉर्पोरेट जबाबदारीशी निगडीत कामकाजांमध्येही केला जाऊ शकतो.