ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:13 IST
1 / 8या शानदार कामगिरीबद्दल त्याला बक्षीस म्हणून एक अत्यंत प्रीमियम आणि दमदार Haval H9 SUV मिळाली आहे. ही एसयूव्ही केवळ तिच्या रफ ॲन्ड टफ लुकसाठीच नव्हे, तर अत्याधुनिक फीचर्स आणि लक्झरी ऑफ-रोडिंग क्षमतेसाठीही ओळखली जाते. चायनीज ऑटोमोबाइल कंपनी ग्रेट वॉल मोटरने ही बनवली आहे.2 / 8Haval H9 मध्ये २.० लिटर टर्बोचार्ज्ड ४-सिलेंडर इंजिन आहे, जे ३८० NM चा टॉर्क देते. यात ८-स्पीड ऑटोमॅटिक ZF ट्रान्समिशन तंत्रज्ञान वापरले आहे.3 / 8या एसयूव्हीची रचना ऑफ-रोड क्षमता आणि लक्झरी कम्फर्टचा उत्तम संगम आहे. खडबडीत असो वा शहरी रस्ते, ही गाडी उत्कृष्ट प्रदर्शन करते. यात वाळू, चिखल, बर्फ यांसारख्या अनेक ड्रायव्हिंग मोड्सचा समावेश आहे.4 / 8सुरक्षिततेसाठी यात सहा एअरबॅग्ज, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ट्रॅफिक जॅम असिस्ट यांसारखे अत्याधुनिक फीचर्स आहेत. पार्किंगसाठी ३६० डिग्री व्ह्यू कॅमेराही दिला आहे.5 / 8Haval H9 चे बाह्य डिझाइन खूप आकर्षक आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ आणि इलेक्ट्रिक साइडस्टेप्स आहेत, जे या गाडीला अधिक स्टायलिश बनवतात.6 / 8आतमध्ये १४.६ इंचाचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, १० स्पीकर्स आणि वायरलेस चार्जर आहे. ड्रायव्हरसाठी लेदर मेमरी सीट्स आहेत, ज्यात व्हेंटिलेशन आणि मसाजचे फीचर्स मिळतात.7 / 8सौदी अरेबियातील अधिकृत वेबसाइटनुसार, Haval H9 ची किंमत सुमारे १,४२,१९९.८ सऊद रियाल आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ३३.६० लाख रुपये होते.8 / 8Haval हा चीनच्या प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी ग्रेट वॉल मोटरच्या मालकीचा ब्रँड आहे, जो क्रॉसओवर आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक मोठे नाव आहे.