शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:57 IST

1 / 10
सोशल मीडियावर 'द रिबेल किड' म्हणून प्रसिद्ध असलेली अपूर्वा मुखिजा सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. तिला फ्लाइटमध्ये आपत्कालीन सीट देण्यास नकार देण्यात आला. एअरलाईन कर्मचाऱ्याने तिला ‘सक्षम’ नसल्याचे कारण दिले.
2 / 10
अपूर्वाने तिचा हा अनुभव इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. काउंटरवरील महिलेने सांगितले की, 'आम्ही ही सीट अपंग लोकांना देऊ शकत नाही, चेहऱ्यावरुन तू आजारी वाटतेस.' या प्रतिकेनंतर अपूर्वाला धक्का बसला.
3 / 10
मात्र, अपूर्वाची कामगिरी वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अपूर्वाचं खरं नाव अपूर्वा मुखिजा असून ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे. ती 'द रिबेल किड' या नावाने ओळखली जाते.
4 / 10
अपूर्वाने २०२० च्या कोविड लॉकडाऊन दरम्यान व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तिचे विनोदी व्हिडीओ आणि छोट्या ब्लॉग पोस्ट्सने ती अल्पावधीत सोशल मीडियावरील एक प्रमुख प्रभावशाली व्यक्ती बनली आहे.
5 / 10
अपूर्वाचा जन्म १९९८ मध्ये दिल्लीतील नोएडामध्ये झाला. तिने जयपूरच्या मणिपाल विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने डिजिटल कंटेट क्रिएशनलाच पूर्णवेळ करिअर बनवले.
6 / 10
तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत सोशल मीडिया जाहिराती आणि ब्रँड सहयोगातून येतो. जून २०२५ च्या एका अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती तब्बल ४१ कोटी रुपये आहे. तसेच, ती दररोज सुमारे अडीच लाख रुपये कमावते.
7 / 10
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अपूर्वा ३० सेकंदांच्या एका इन्स्टा स्टोरीसाठी २ लाख रुपये घेते. तर एका रीलमधून ती तब्बल ६ लाख रुपये कमावते.
8 / 10
दुसऱ्या एका वृत्तानुसार, ती इंस्टाग्रामवर प्रत्येक पोस्टसाठी २ ते ५ लाख रुपये आकारते. युट्यूबवरून तिला दरमहा ५ लाख रुपयांपर्यंत कमाई होते, तर ब्रँड डीलमधून ती प्रत्येक ब्रँडसाठी १० लाख रुपये घेते.
9 / 10
तिने आतापर्यंत १५० पेक्षा जास्त मोठ्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. यामध्ये NIKE, OnePlus, Netflix, Amazon, Google, Meta, Maybelline आणि Swiggy सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय तिने काही वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
10 / 10
तिच्या या यशाची दखल फोर्ब्सने घेतली आहे. फोर्ब्सने २०२३ आणि २०२४ मध्ये तिला 'टॉप १०० डिजिटल स्टार्स'च्या यादीत समाविष्ट केले होते. अपूर्वाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम