५ लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार; आयुष्मान योजनेसाठी काय आहे पात्रता? कुठे करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:18 IST
1 / 8नवीन वर्षात निरोगी आरोग्यासाठी तुम्ही नक्कीच संकल्प केला असेल. पण, त्यासोबत वैद्यकीय आणीबाणी आली तर त्याच्यासाठी तयार आहात का? जर तुम्हाला महागडा आरोग्य विमा परवडत नसेल तर तुम्ही सरकारी योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत तुम्हाला आरोग्य विमा संरक्षण मिळते.2 / 8जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर आधी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासावे लागेल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in ला भेट द्यावी लागेल. 3 / 8यानंतर तुम्हाला येथे 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक भरावा लागेल ज्यावर OTP येईल.4 / 8आता हा OTP आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरून लॉगिन करा. यानंतर योजना निवडून आपलं राज्य आणि तुमचा जिल्हा निवडा. यानंतर, 'सर्च बाय' वर जा आणि आधार सारखे कोणतेही एक दस्तऐवज निवडा आणि नंतर तुमचा आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा देखील प्रविष्ट करा. आता सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही हे समजेल.5 / 8जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता.6 / 8संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासून काही कागपत्रांची मागणी करेल. त्यानंतर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.7 / 8अर्ज केल्यानंतर, तुमचे आयुष्मान कार्ड काही वेळात तयार होईल जे तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. 8 / 8यानंतर, या कार्डद्वारे तुम्ही योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकता.