1 / 9Gautam Adani : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आरोग्य क्षेत्रात आता आपली छाप सोडण्याच्या विचारात आहेत. या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी अदानी डायग्नोस्टिक चेन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना आखत आहेत. 2 / 9लाईव्ह मिंटनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मिटनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदानी आणि अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राईजेस लिमिटेड, डायग्नोस्टिक चेन मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलींचं व्हॅल्युएशन करत आहे.3 / 9सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात मेट्रोपोलिस आणि त्यांच्या ऑपरेशन मार्केट कॅपला पाहता हा व्यवहार जवळपास १ अब्ज डॉलर्सचा असू शकतो. 4 / 9यापूर्वीही मिंटनं अदानी हे आरोग्य क्षेत्रात येण्याच्या प्रयत्नात असल्याचं म्हटलं होतं. यासाठी अदानी समूह मोठी रुग्णलाये, डायग्नोस्टीक चेन आणि ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही फार्मसींचं अधिग्रहण करू शकतं.5 / 9अदानी समूहानं आरोग्य सेवा क्षेत्रात पाय रोवण्यासाठी व्यवसायासाठी ४ अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम ठरवली आहे. याशिवाय दीर्ध कालावधीसाठी फंडिंग योजना तयार करण्यासाठी गुंतवणूकदार आणि लेंडर्सशी चर्चाही सुरू आहे. सध्या अदानी समूह आणि मेट्रोपोलिस यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.6 / 9अदानी समूह भारतील मोठ्या समुहांपैकी एक आहे. याचं वार्षिक उत्पनन २० मिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. अदानी समूह अन्य उद्योगांशिवाय वीज, ग्रीन एनर्जी, पायाभूत सुविधा, फूड प्रोसेसिंग आणि विमानतळांच्या व्यवसायातही उतरला आहे. 7 / 9१९८० च्या दशकात एकमेव प्रयोग शाळेच्या रुपात मेट्रोपोलिसनं सुरूवात केली आणि २००५ मध्ये खासगी इक्विटी फर्म आयसीआयसीआय व्हेन्चर्सकडून पहिल्यांदा ३५ कोटींचा निधी मिळवला. यानंतर पीई फर्म वारबर्ग पिंकसकडून ८५ मिलियन डॉलर्स मिळाले होते. यामुळे आयसीआयसीआय व्हेन्चरला बाहेर पडण्यास मदत मिळाली.8 / 9२०१५ मध्ये संस्थापक शाह कुटुंबानं केकेआर इंडियाच्या पाठिंब्यानं वारबर्ग पिंकसचा २७ टक्के हिस्सा ५५० कोटींमध्ये पुन्हा खरेदी केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये कंपनीनं मार्की गुंतवणूकदार कार्लाइल ला संचालक मंडळात आणलं. 9 / 9२०१५ मध्ये संस्थापक शाह कुटुंबानं केकेआर इंडियाच्या पाठिंब्यानं वारबर्ग पिंकसचा २७ टक्के हिस्सा ५५० कोटींमध्ये पुन्हा खरेदी केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये कंपनीनं मार्की गुंतवणूकदार कार्लाइल ला संचालक मंडळात आणलं.