शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर्समधील पडझड कायम, Adani Group ला मोठा फटका; बाजारही डाऊन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:35 PM

1 / 10
गेल्या अनेक दिवसांपासून तेजीत असलेल्या अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स एका वृत्तानंतर मोठ्या प्रमाणात कोसळले. अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 10
तसेच शेअर बाजाराच्या तेजीच्या घोडदौडीला लगाम लागला असून, भांडवली बाजारात आज नफेखोरीने सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आहे. आज बुधवारी सेन्सेक्स २५० अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये ८० अंकांची घसरण झाली आहे.
3 / 10
शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रीन २ टक्के, अदानी एन्टरप्राईज १.२ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अदानी पोर्ट ४ टक्के आणि अदानी पॉवर ५ टक्क्यांनी कोसळले.
4 / 10
बुधवारीही बहुतांश शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती.
5 / 10
मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी १८ शेअर घसरले आहेत तर १२ शेअरमध्ये वाढ झाली आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला असून तो ७३.२६ वर आहे.
6 / 10
रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एल अँड टी, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
7 / 10
दुसरीकडे, नेस्ले, एचयूएल, ओएनजीसी, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये वाढ झाली आहे. बुधवारच्या सत्रात सत्रात धातू क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली आहे. यामुळे मागील काही महिने तेजीत असलेल्या धातू क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण झाली आहे.
8 / 10
सेल, जिंदाल स्टील, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. गेल्या काही सत्रात बाजारात अस्थिरता वाढली आहे. काही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत तर काही कंपन्यांना गुंतवणूकदारानी संजीवनी दिली आहे.
9 / 10
बेंचमार्क निर्देशांकांनी सलग चार दिवसांपर्यंत तेजी वाढविली आणि नवीन उच्चांकापर्यंत पोहोचली. मंगळवारी स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे ०.४० टक्के आणि ०.६० टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली.
10 / 10
निफ्टी फार्मा दिवसातील सर्वात मोठे नुकसान ठरले आणि निफ्टी मीडिया क्षेत्राने सर्वाधिक कमाई केली. त्यानंतर रिअल्टी आणि खाजगी बँकिंग क्षेत्रांची जागा ठरली.