लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एक रिपोर्ट आणि Adani ना बसला २,६१,४४,५३,८२,००० रुपयांचा फटका, टॉप २० मधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 11:56 IST
1 / 7शुक्रवारी अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक अहवाल या मोठ्या घसरणीचं कारण ठरला. त्यानुसार अदानी समुहाच्या कंपन्यांची अमेरिकेच्या नियमाकामार्फत तपास सुरू आहे.2 / 7गुंतवणूकदारांसमोर समुहानं केलेलं सादरीकरण तपासलं जात आहे. हा अहवाल येताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. समुहाचे सर्व 10 शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरून बंद झाले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही घसरण दिसून आली.3 / 7ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अदानींच्या संपत्तीत 3.19 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,61,44,53,82,000 रुपयांची घट झाली आहे. आता त्याची एकूण संपत्ती 58.2 बिलियन डॉलर्स झाली आहे. 4 / 7या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 62.3 अब्ज डॉलर्सनं घसरली आहे. यासह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चार स्थानांनी घसरून 23व्या स्थानावर पोहोचले आहेत.5 / 7अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं 24 जानेवारी रोजी अदानी समूहासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले आहेत.6 / 7या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, अलीकडच्या काळात परिस्थितीत पुन्हा सुधारली होती. पण पुन्हा एकदा आता एका अहवालामुळे अदानींना मोठा फटका बसला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.7 / 7समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वाधिक 6.8 टक्क्यांनी घसरले आणि त्याचे मार्केट कॅप 18,559 कोटी रुपयांनी कमी झाले. त्याचप्रमाणे अदानी ट्रान्समिशन 6.4 टक्के, अदानी पॉवर 5.6 टक्के, अंबुजा सिमेंट्स 4.2 टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4.2 टक्क्यांनी घसरण झाली.