शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रस्त्यावरील ७५ लाख विक्रेत्यांना झालाय फायदा, अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेली Svanidhi Yojana आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 8:40 AM

1 / 6
Budget 2024 : २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) पंतप्रधान स्वनिधी योजनेचा (PM Svanidhi Yojana) उल्लेख केला. पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत रस्त्यांवरील ७८ लाख विक्रेत्यांना क्रेडिट देण्यात आलं आहे. त्यापैकी २.३ लाख लोकांना तिसऱ्यांदा क्रेडिट मिळालं असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
2 / 6
कोरोनाच्या महासाथीनंतर रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे छोटे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती, जी आज या सर्व विक्रेत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा मिळवायचा.
3 / 6
पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देते. हे कर्ज तारणमुक्त आहे, म्हणजेच यासाठी विक्रेत्यांना बँकेकडे काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. हे कर्ज तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. ही रक्कम १२ महिन्यांत परत करावी लागते.
4 / 6
व्यवसाय सुरू करण्यासाठी, या योजनेअंतर्गत, प्रथमच १० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज केला जाऊ शकतो. जर पैसे वेळेवर फेडले गेले तर, विक्रेते दुप्पट रकमेचे म्हणजे २० हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी पात्र होतात आणि तिसऱ्या वेळी ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
5 / 6
विक्रेते पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकतात. यासाठी पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म बँकेत भरावा लागेल. फॉर्मसोबत आधार कार्डाची झेरॉक्स जोडावी लागेल.
6 / 6
अशा परिस्थितीत विक्रेत्यांकडे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे. याशिवाय मोबाईल क्रमांक आणि बँक खातंही असणं आवश्यक आहे. तुमचं कर्ज मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल. या अंतर्गत दरवर्षी ७ टक्के दरानं सब्सिडीच्या माध्यमातून नियमित रिपेमेंटला प्रोत्साहित केलं जातं. यामध्ये १२०० रुपयांपर्यंतचं कॅशबॅकही दिलं जातं.
टॅग्स :businessव्यवसायprime ministerपंतप्रधान